AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price: सोन्याविषयी सर्वात मोठे भाकीत, तो रेकॉर्डही मोडणार, दीड लाखांचाही टप्पा ओलांडणार? कोण मालामाल होणार?

Gold Price Today: सोन्याच्या किंमतींनी यावर्षी मोठी चढाई केल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. तर आता अजून सोन्यात मोठी रॅली येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थात त्यासाठी नवीन वर्ष उजाडावे लागेल. इतक्या झरझर वाढतील सोन्याच्या किंमती.

Gold Price: सोन्याविषयी सर्वात मोठे भाकीत, तो रेकॉर्डही मोडणार, दीड लाखांचाही टप्पा ओलांडणार? कोण मालामाल होणार?
सोन्याचा नवीन विक्रम
| Updated on: Nov 13, 2025 | 10:11 AM
Share

Gold Rate Cross 1.5 lakh per gram mark : सोने आणि चांदीत तेजीचा हंगाम लवकरच परतणार आहे. जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरवाढीला उकळी फुटली आहे. गेल्या तीन आठवड्यांच्या उच्चांकावर दोन्ही धातू आहेत. एका अहवालानुसार, वर्ष 2026 मध्ये सोन्याचा भाव प्रति औस 5,000 डॉलर्सपर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच, 10 ग्रॅम सोन्याची किंमत वर्ष 2026 मध्ये 1,59,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजे आजपासून सोने पुढील वर्षांपर्यंत 20 टक्के परतावा देऊ शकते. अमेरिकेत सरकारी शटडाऊनचे संकट टळले आहे. तर अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (US Fed) व्याजदर कपातीची लवकरच घोषणा करू शकते. त्यामुळे गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळतील आणि किंमती वाढतील.

वायदे बाजारात काय स्थिती?

जागतिक बाजारात Comex गोल्ड फ्यूचर्स (डिसेंबर डिलिव्हरी) 0.45% वाढून $4,140.75 प्रति औंसवर पोहोचले. सिल्वर फ्यूचर्सही 0.08% वाढून $50.35 प्रति औस वर पोहचले. मुंबईत 24 कॅरेट सोनं 1,23,830 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोनं 1,13,510 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 1,57,100 रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.

का वाढत आहेत भाव?

Kotak Securities च्या असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट कमोडिटी रिसर्च कनात चैनवाला यांनी सोन्याच्या वाटचालीवर मत मांडले. त्यानुसार, सोमवारी स्पॉट गोल्ड हे 3% वाढले. ते दोन आठवड्यांच्या उच्चांकावर $4,116.7 प्रति औसवर पोहोचले. अमेरिकेतील शटडाऊन संकट संपल्याचा परिणाम दिसला. तर अर्थव्यवस्था मंदावल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

अमेरिकन फेड हे डिसेंबर महिन्यात 64% व्याजदर कपात तर जानेवारीत 77% पर्यंत कपातीचा अंदाज वर्तवला जात आहे. केंद्रीय आणि मध्यवर्ती बँकांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे. गुंतवणूकदारांनी सुद्धा गुंतवणूक वाढवली आहे. चीनच्या मध्यवर्ती बँक (PBOC) सलग 12 व्या महिन्यातही सोने साठा वाढवला. ही सोने खरेदी 74.09 दशलक्ष औंसांपर्यंत पोहोचली आहे. जागतिक मध्यवर्ती बँकांनी तिसऱ्या तिमाहीत (Q3) 220 टन सोन्याची खरेदी केली, जी दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 28% जास्त आहे. गोल्ड ETF (एक्सचेंज ट्रेडेड फंड्स) मध्येही सलग पाचव्या महिन्यात वाढलेली मागणी नोंदवली गेली. ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक 54.9 टन सोनं खरेदी झाली. येत्या काही दिवसात किंमतीत मोठी उलाढाल दिसणार नाही. सोने स्थिर होईल. पण नंतर सोने भरारी घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. JP Morganच्या मते 2026 मध्ये सोने 5000 डॉलर्स प्रति औसच्या घरात पोहचू शकते.

तर ब्लूमबर्गनुसार 2026 च्या अखेरीस म्हणजे पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत सोन्याच्या किंमती $5,200 ते $5,300 प्रति औसपर्यंत पोहोचू शकतात. म्हणजे सोन्याचा भाव दीड लाखांहून अधिक होईल. सध्याच्या गुंतवणुकीवर ग्राहकांना भविष्यात 20% पेक्षा जास्त परतावा मिळू शकतो.

हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.