AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rates Today: सोन्याचे दर 52 हजारच्या पार! तर चांदीही महागली, नेमके आजचे दर काय?

Gold Rates Today: भारतीय सराफा बाजारात (Indian Gold Market) सोन्या चांदीचे दर सकाळी जारी करण्यात आले. त्यानुसार सोन्यासह चांदीच्याही दरांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलंय.

Gold Silver Rates Today: सोन्याचे दर 52 हजारच्या पार! तर चांदीही महागली, नेमके आजचे दर काय?
10 ग्रॅम सोन्यासाठी एवढा रिकामा होईल खिसा Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 11, 2022 | 2:15 PM
Share

नवी दिल्ली : सोन्याच्या किंमती (Gold Rates Today) पुन्हा एकदा नवे उच्चांक गाठण्याच्या तयारी असल्याचं दिसून आलंय. सोमवारी सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा वधारल्या आहेत. सोन 52 हजार रुपये प्रति दहा ग्राम इतक्या दरांवर पोहोचलंय. तर चांदीचे दरही (Silver Rates Today) 67 हजार रुपयांच्या पार गेले आहे. भारतीय सराफा बाजारात (Indian Gold Market) सोन्या चांदीचे दर सकाळी जारी करण्यात आले. त्यानुसार सोन्यासह चांदीच्याही दरांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलंय. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीचे दिवस वाढत असून त्याचा फटका सोनं खरेदी करणाऱ्यांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढलेल्या दरांमुळे सोने खरेदीचा उत्साहदेखील मावळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. सोन्याचे दर सकाळी आणि संध्याकाळी दररोज जारी केले जाता. ibjarates.com या वेबसाईटवर जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 999 प्युअरीटी असलेल्या सोन्याचे दर 52 हजार रुपयांच्या पार गेलेल आहे.

सध्या 999 प्युअरीटी सोन्याचा दर हा 52 हजार 157 रुपयांवर पोहोचला आहे. सोमवारी सकाळी 999 प्युअरिटी असलेल्या सोन्याच्या दरांमध्ये 318 रुपयाची वाढ झाली आहे. तर 995 प्युअरीटी असलेलं सोनं 317 रुपयांनी महागलं आहे.

जाणून घ्या सोमवारचे सकाळचे दर! सोनं (प्रति 10 ग्राम)

  1. प्युअरिटी 999 आज सकाळचा दर 52157
  2. प्युअरिटी 995 आज सकाळचा दर 51948
  3. प्युअरिटी 47776 आज सकाळचा दर 916
  4. प्युअरिटी 750 आज सकाळचा दर 39118
  5. प्युअरिटी 585 आज सकाळचा दर 30512

चांदी प्रति एक किलो

प्युअरिटी 999 आज सकाळचा दर 67063

सोन्याचे ताजे दर कसे जाणून घ्या?

सोन्याचे ताजे भाव जाणून घ्यासाठी 8955664433 वर मिसकॉल देऊन तुम्ही हे दर जाणून घेऊ शकता. IBJA कडून शनिवार आणि रविवार वगळता दररोज सोन्याचे दर जाहीर केले जात असतात. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दर तुम्ही जाणून घेऊ शकता.

सोन्याची प्युअरीटी कशी तपासावी?

सोनं शुद्ध आहे की अशुद्ध, हे तपासणं सोनं खरेदीच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. सोनं खरेदीवेळी त्यावर हॉलमार्कचे निशाण असतात. या हॉलमार्कवर 24 कॅरेटपर्यंतची माहिती दिलेली असते. 22 कॅरेट सोनं असेल तर त्यावर 916 असं नमूद केलेलं असतं. तर 21 कॅरेट सोन्यावर 875 असं लिहिलेलं असतं. 18 कॅरेट सोन्यावर 750 तर 14 कॅरेट सोन्यावर 585 असं नमूद केलेलं असतं.

संबंधित बातम्या :

पेट्रोल डिझेलच्या दरात सामान्यांना दिलासा; जाणून घ्या आजचे महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील दर

Sri Lanka झाली आता नेपाळवर आर्थिक अस्थिरतेचे ढग! सायकल ते तांदूळ आयातीवर निर्बंध

Startups कंपन्यांना अच्छे दिन; चालू वर्षाच्या पहिल्या तीमाहीत उभारले 10.8 अब्ज डॉलरपेक्षा अधिक भांडवल

पाहा महाराष्ट्रातील महत्त्वाची बातमी :

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.