Gold Silver Price Today: सोन्यावाणी संधी वाया घालवू नका, सोन्या चांदीचे दर घसरले, खरेदीला आज चांगला मुहूर्त

Gold Silver price: आज सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली. 999 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचे दर स्वस्त झाले आहे. सोन्याचा दर आज 51,581 रुपये आहे. तर 999 शुद्ध एक किलो चांदीचा भाव 56,081 रुपये आहे.

Gold Silver Price Today: सोन्यावाणी संधी वाया घालवू नका, सोन्या चांदीचे दर घसरले, खरेदीला आज चांगला मुहूर्त
आजचे सोन्या चांदीचे भावImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 3:16 PM

आठवड्याच्या मध्यात तिस-या दिवशी भारतीय सराफा बाजाराने (Sarafa Market) सोन्या चांदीच्या किंमती जाहीर केल्या आहेत. आज सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. सोमवारी आणि मंगळवारी सोन्याचे भाव वाढले होते. सरकारने सोन्यावर आयत शुल्क (Import Duty) वाढवले आहे. त्याचा परिणाम दिसून आला होता. सोन्याचे भाव लवकरच आणखी वाढतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याचदरम्यान बुधवारी, 6 जुलै रोजी सोन्याचे भाव घसरले. आज पुन्हा सोने आणि चांदीत (Gold Silver Price) घसरणीचे सत्र पहायला मिळाले. शुद्ध सोन्याचे भाव आज 52 हजारांच्या आत तर शुद्ध चांदीची किंमत(Silver Price) आज 57 हजार रुपये प्रति किलो होती. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ibjarates.com वर आजचे सोन्या-चांदीचे भाव दिले आहेत. त्यानुसार,6 जुलै रोजी 999 शुद्ध 24 कॅरेट सोन्याचा भाव 52 हजार रुपयांवरुन घसरुन 51,581 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. गेल्या अनेक दिवसांपासून सोने 50 हजारांच्या तर चांदी 60 हजार रुपयांच्या घरात विक्री होत होती.

ibjarates.com नुसार, 999 शुद्ध असलेल्या 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज घसरण झाली आहे. सोने प्रति 10 ग्रॅम 51,581 रुपये दर आहे. तर 999 शुद्ध असलेल्या चांदीचा भावात प्रचंड घसरण झाली आहे. गेल्यावेळी एक किलो चांदीचा भाव 65,825 रुपये होता, मंगळवारी चांदीचा भाव 66,468 रुपये प्रति किलो होता तर आज बुधवारी चांदी 56081 प्रति किलो दराने मिळत होती.

हे सुद्धा वाचा

काय आहे आजचे सोन्याचे भाव

999 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर आज 51,581 रुपये आहे. तर 995 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर बुधवारी 51,374 रुपये होता. 916 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर आज 47,248 रुपये आहे. 750 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर बुधवारी 38686 रुपये आहे.

अशी तपासा सोन्याची शुद्धता

सोन्याची शुद्धता तुम्हाला घरबसल्या तपासता येते. BIS Care App च्या माध्यमातून तुम्ही सोन्याचा शुद्धपणा तपासू शकता. एवढेच नाही तर तुम्हाला सोन्यात भेसळ असल्याचे समजले अथवा सोन्याच्या व्यवहारात तुमची फसवणूक झाल्यास या अॅपवर तुम्हाला तक्रार ही दाखल करता येते. तक्रारीची दखल घेतल्यासंबंधीची माहिती ही अॅपद्वारे तुम्हाला प्राप्त होईल.

शुद्ध सोन्याची ओळख अशी करा

सोन्याच्या दागिन्याची शुद्धता ओळखण्याची एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमार्कशी संबंधित अनेक चिन्हे दिसून येतात. या चिन्हांमुळे सोन्याची गुणवत्ता सिद्ध होते. सोने कोणत्या कॅरेटचे आहे ते दिसून येते. सोन्यामध्ये एक कॅरेटपासून ते 24 कॅरेटपर्यंतची तफावत असते. सोन्याचे दागिने तयार करण्यसाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर होतो. ज्वेलरी वर हॉलमार्क लावणे, चिन्हांकित करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 24 कॅरेट सोने शुद्ध मानण्यात येते. त्यावर 999 अंक चिन्हांकित असते. या सोन्यापासून दागिने तयार करण्यात येत नाही. 22 कॅरेट चे दागिने असतील तर त्यावर 916 अंक चिन्हांकित असतो. 21 कॅरेटचे दागिने असतील तर त्यावर 875 हा अंक चिन्हांकित करण्यात येतो. 18 कॅरेटच्या ज्वेलरीवर 750 अंक असतो. तर 14 कॅरेटच्या दागिन्यावर 585 अंक असतो.

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.