AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : खरेदीसाठी सुवर्णसंधी ! सोन्याचे आजचे भाव पाहून मोह आवरणार नाही, 10 ग्रॅम सोनं..

Gold Price Today 09 July Latest News Updates in Marathi: पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे एकीकडे कच्चा तेलाच्या किंमती पुन्हा पेटल्या आहेत. त्यामुळे महागाईची चिंता वाढली असून अमेरिकी बॉन्ड यील्ड आणि डॉलर बळकट झाला. त्याचा परिणा देशांतर्गत सोन्याच्या किमतींवर झाला. आज भारतात 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर..

Gold Price Today : खरेदीसाठी सुवर्णसंधी ! सोन्याचे आजचे भाव पाहून मोह आवरणार नाही, 10 ग्रॅम सोनं..
9 जुलै रोजी सोन्याचे लेटेस्ट दर करा चेक
| Updated on: Jul 09, 2026 | 9:14 AM
Share

देशभरात सोन्याच्या किमतीतील घसरणीचा कल कायम असून, बहुतेक प्रमुख शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर पुन्हा कमी झाले आहेत. 9 जुलै रोजी सकाळी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,43,270 रुपये किमतीवर आला, तर मुंबईमध्ये तो 1,43,120 प्रति 10 रुपये ग्रॅम नोंदवला गेला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा दर 4,056.24 डॉलर प्रति औंस इतका आहे. पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे महागाईबाबतची चिंता पुन्हा वाढली असून, अमेरिकन बाँड यिल्ड आणि डॉलर मजबूत झाले आहेत. परिणामी, जागतिक बाजारातील सोन्याच्या किमतींवर दबाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येत आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा अंतरिम शांतता करार संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर अमेरिकेने इराणच्या लष्करी पायाभूत सुविधांवर आणि एका रेल्वे पुलावर हवाई हल्ले केल्याचे वृत्त आहे. यापूर्वी अमेरिकेने इराणवर होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर हल्ले केल्याचा आरोप केला होता.

प्रमुख शहरांतील सोन्याचे दर

राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 1,43,270 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,31,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबई आणि कोलकाता या दोन शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 1,31,190 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,43,120 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चेन्नईमध्ये सोनं महाग आहे. तिथे 24 कॅरेट सोन्याचा दर 1,44,540 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,32,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुणे आणि बंगळुरूमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,43,120 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा किंमत 1,31,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

सोन्याचे भाव आज किती ?

शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर  (₹) 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर  (₹)
दिल्ली 131340 143270
मुंबई 131190 143120
अहमदाबाद 131240 143170
चेन्नई 132490 144540
कोलकाता 131190 143120
हैदराबाद 131190 143120
जयपुर 131340 143270
भोपाळ 131240 143170
लखनऊ 131340 143270
चंदीगड 131340 143270

चांदीचे भाव

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही सातत्याने घसरण होत असल्याचे दिसून आले. 9 जुलैच्या सकाळी चांदीचा दर 2,44,900 रुपये प्रति किलो इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरची किंमत 58.61 डॉलर प्रति औंस इतकी आहे. देशांतर्गत सोन्या-चांदीच्या किमतींवर स्थानिक घटकांबरोबरच जागतिक आर्थिक घडामोडींचाही मोठा प्रभाव पडतो.

Follow Us
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो, नाशिकमधून मोठी माहिती समोर!
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा राऊत प्रकरणी सर्वात मोठी अपडेट
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ... भर मंचावरून दत्ता भरणेंचं मोठं विधान
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात..

इराणची जगाला धमकी! हाहाकाराला सुरूवात, थेट इतिहासातील सर्वात मोठा हल्ला, इराणने...

इराणची जगाला धमकी! हाहाकाराला सुरूवात, थेट इतिहासातील सर्वात मोठा हल्ला, इराणने..

धावत्या लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार; दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी, दोघांची प्रकृती गंभीर.

धावत्या लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार; दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी, दोघांची प्रकृती गंभीर

Horoscope Today 16th July 2026 : मान मोडून काम करावं लागणार, या राशीसाठी आजचा दिवस भलताच…  वाचा मेष ते मीनचं भविष्य.

Horoscope Today 16th July 2026 : मान मोडून काम करावं लागणार, या राशीसाठी आजचा दिवस भलताच… वाचा मेष ते मीनचं भविष्य

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल.

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं.

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं