Gold Silver Price Today : सोने खरेदी करणे महागले, नेमकी किंमत किती?

सोमवारी सोन्याचा भाव 53 रुपयांनी वाढून 47,956 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर डिसेंबर डिलिव्हरीसाठीचे करार 53 रुपये म्हणजेच 0.11 टक्क्यांनी वाढून 47,956 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करीत होते. हे सोने 9,313 लॉटच्या व्यवसायाच्या उलाढालीसाठी आहे.

Gold Silver Price Today : सोने खरेदी करणे महागले, नेमकी किंमत किती?
gold rates

नवी दिल्लीः Gold Silver Rate Today : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 29 रुपयांनी वाढून 46,974 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. HDFC सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमती कमकुवत असूनही रुपयाच्या घसरणीमुळे हे घडलेय. मागील व्यवहारात सोने 46,945 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते.

चांदीचा भाव 149 रुपयांनी घसरून 60,137 रुपये प्रतिकिलो

मात्र, चांदीचा भाव 149 रुपयांनी घसरून 60,137 रुपये प्रतिकिलो झाला. यासह चांदीचा भाव मागील व्यवहारात 60,286 रुपये किलोवर पोहोचलाय. विशेष म्हणजे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 30 पैशांनी घसरून 75.42 (तात्पुरता) वर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,781 डॉलर प्रति औंस झाला. त्याच वेळी चांदीचा भाव 22.38 डॉलर प्रति औंस राहिला.

सोने का वाढले?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (वस्तू) तपन पटेल यांनी सांगितले की, कॉमेक्स ट्रेंडिंगवर स्पॉट सोन्याच्या किमतींसह सोन्याच्या किमती कमजोर होत आहेत. सोमवारी ते 1,781 डॉलर प्रति औंसवर आले. सोन्याचे भाव दबावाखाली व्यवहार करत असल्याचे त्यांनी सांगितले. मिश्र संकेतांमुळे ते 1,780 डॉलर प्रति औंसवर व्यापार करत होते.

सोन्याचा भाव 53 रुपयांनी वाढून 47,956 रुपये प्रति 10 ग्रॅम

सोमवारी सोन्याचा भाव 53 रुपयांनी वाढून 47,956 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर डिसेंबर डिलिव्हरीसाठीचे करार 53 रुपये म्हणजेच 0.11 टक्क्यांनी वाढून 47,956 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करीत होते. हे सोने 9,313 लॉटच्या व्यवसायाच्या उलाढालीसाठी आहे.

मुंबई आणि कोलकातात सोन्याची किमती किती?

दुसरीकडे वायदा व्यवहारात चांदीचा भाव 138 रुपयांनी घसरून 61,378 रुपये प्रति किलो झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये डिसेंबर डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 138 रुपयांनी किंवा 0.22 टक्क्यांनी घसरून 61,378 रुपये प्रति किलो झाला. या किमती 12,788 लॉटच्या व्यावसायिक उलाढालीत आहेत.

चांदी 61,500 रुपये प्रति किलोने खरेदी केली जाऊ शकते

पश्चिम बंगालची राजधानी आणि महानगर कोलकाता येथे सोन्याचा भाव 48,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. या शहरात चांदी 61,500 रुपये प्रति किलोने खरेदी केली जाऊ शकते. दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबई महानगरात सोन्याचा भाव 47,685 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय. महाराष्ट्राच्या राजधानीत चांदीचा भाव 61 हजार 233 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

संबंधित बातम्या

रोख पैशांचे व्यवहार घटले, UPI ट्रान्झॅक्शनमध्ये 70 पटीने वाढ, नोव्हेंबरमध्ये दररोज 25000 कोटींची उलाढाल

PF Update | खुशखबरः पीएफ खात्यात व्याज जमा; ‘असा’ चेक करा तुमचा बॅलन्स

Published On - 5:36 pm, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI