रोख पैशांचे व्यवहार घटले, UPI ट्रान्झॅक्शनमध्ये 70 पटीने वाढ, नोव्हेंबरमध्ये दररोज 25000 कोटींची उलाढाल

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, डिजिटल व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झालीय, परंतु सध्या मूल्य आणि व्हॉल्यूमच्या बाबतीत थोडीशी घट झाली. ऑक्टोबर महिन्यात ही विक्रमी पातळी होती. नोव्हेंबरमध्ये UPI व्यवहारांमध्ये 0.71 टक्क्यांची घट झाली. ऐन सणासुदीच्या काळात ऑक्टोबरमध्ये अशा व्यवहारांमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली होती.

रोख पैशांचे व्यवहार घटले, UPI ट्रान्झॅक्शनमध्ये 70 पटीने वाढ, नोव्हेंबरमध्ये दररोज 25000 कोटींची उलाढाल
इंटरनेटशिवाय देखील करू शकता युपीआय पेमेंट

नवी दिल्लीः मोदी सरकारनं डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी उपाययोजना राबवल्यापासून गेल्या काही वर्षांत डिजिटल व्यवहारात ऐतिहासिक तेजी आलीय. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात डिजिटल व्यवहारांना खूप गती प्राप्त झालीय. गेल्या चार वर्षांत UPI व्यवहारांमध्ये जवळपास 70 पट वाढ झाली. या काळात डेबिट कार्ड व्यवहारात घट झाली.

नोव्हेंबरमध्ये UPI व्यवहारांमध्ये 0.71 टक्क्यांची घट झाली

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, डिजिटल व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झालीय, परंतु सध्या मूल्य आणि व्हॉल्यूमच्या बाबतीत थोडीशी घट झाली. ऑक्टोबर महिन्यात ही विक्रमी पातळी होती. नोव्हेंबरमध्ये UPI व्यवहारांमध्ये 0.71 टक्क्यांची घट झाली. ऐन सणासुदीच्या काळात ऑक्टोबरमध्ये अशा व्यवहारांमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली होती. ऑक्टोबरमध्ये सलग पाचव्या महिन्यात डिजिटल व्यवहारांमध्ये तेजी होती. मात्र, नोव्हेंबर महिन्यात त्यात घट झाली. आधी मे महिन्यात ऑनलाईन व्यवहारात घट झाली होती.

दररोज 13 कोटींचे व्यवहार

अहवालानुसार, नोव्हेंबर महिन्यात एकूण 418 कोटी UPI व्यवहार झाले. एकूण व्यवहार मूल्य 7.68 लाख कोटी रुपये आहे. ऑक्टोबरमध्ये एकूण UPI व्यवहारांची संख्या 421 कोटी होती. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये व्यवहार मूल्यात 0.40 टक्क्यांनी घट झाली. नोव्हेंबर महिन्यात दररोज 13 कोटी व्यवहार झाले. दैनंदिन व्यवहाराचे मूल्य सुमारे 25 हजार कोटी आहे.

UPI म्हणजे काय?

युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस / यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) ही रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे, जी मोबाईल अॅपद्वारे त्वरित बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकते. UPI द्वारे तुम्ही एका बँक खात्याला अनेक UPI अॅप्ससह लिंक करू शकता. त्याच वेळी एका UPI अॅपद्वारे अनेक बँक खाती चालवली जाऊ शकतात.

अशी तपासा शिल्लक

तुमच्या खात्यातून पैसे हस्तांतरित झाल्याचे किंवा पैसे कापल्याचा त्वरित मेसेज येतो. जर नाही आला तर किती पैसे कापले गेले आणि किती शिल्लक आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही खात्याचा मेसेज तपासू शकता. जर तुम्ही Google Pay द्वारे UPI पेमेंट केले तर यासाठी तुम्हाला Google Pay उघडावे लागेल. तेथे वरच्या बाजूला उजवीकडे तुमच्या बँक खात्यावर टॅप करा. ज्या खात्याची शिल्लक आपण तपासू इच्छित आहात त्यावर टॅप करा. येथे balance check वर क्लिक करा आणि आपला UPI पिन टाका. हे तुमच्या खात्यातील शिल्लक दर्शवेल. ते दिसत नसल्यास आपण योग्य पिन टाकल्याची खातरजमा करून घ्या. जर तुम्ही पिन नंबर विसरलात तर तुम्ही नवीन पिन तयार करू शकता. यासाठी तुम्हाला बँक खाते हटवावे लागेल आणि ते पुन्हा जोडावे लागेल.

संबंधित बातम्या

PF Update | खुशखबरः पीएफ खात्यात व्याज जमा; ‘असा’ चेक करा तुमचा बॅलन्स

क्रिप्टो करन्सींच्या दरामध्ये घसरण, ‘असे’ आहेत नवीन दर

Published On - 4:17 pm, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI