AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 14 June 2024 : आठवड्याच्या अखेरीस मौल्यवान धातूंनी दिली आनंदवार्ता, चांदी घसरली, सोन्याने दिला दिलासा

Gold Silver Rate Today 14 June 2024 : आठवड्याच्या अखेरच्या टप्प्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. या आठवड्यात दोन्ही मौल्यवान धातूत चढउताराचे सत्र आहे. काल दोन्ही धातूच्या किंमतीत वाढ झाली होती. आज किंमती घसरल्या आहेत.

Gold Silver Rate Today 14 June 2024 : आठवड्याच्या अखेरीस मौल्यवान धातूंनी दिली आनंदवार्ता, चांदी घसरली, सोन्याने दिला दिलासा
सोने-चांदीत नरमाई
| Updated on: Jun 14, 2024 | 8:27 AM
Share

आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीने नरमाईचा सूर आळवला होता. तर अखेरच्या सत्रात दोन्ही धातूत घसरण दिसत आहे. मध्यंतरी किंमती वधारल्या होत्या. चढउताराच्या या सत्रात ग्राहकांना आता मौल्यवान धातू खरेदीची संधी आहे. चांदी 600 रुपयांनी घसरली आहे. तर सोन्याचा भाव जैसे थे आहे. ग्राहकांच्या खिशाला या आठवड्यात मोठी झळ बसलेली नाही. गेल्या आठवड्यातही त्यांना दिलासा मिळाला होता. काय आहेत आता किंमती?(Gold Silver Price Today 14 June 2024 )

सोने जैसे थे

या आठवड्यात आताप्रयंत सोने 490 रुपयांनी वधारले. गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही सोन्याला कमाल दाखवता आली नाही. 10 जून रोजी किंमती जैसे थे होत्या. 11 जूनला 170 रुपये, 12 जून रोजी 320 रुपयांनी भाव वधारला. तर 13 तारखेला भावात बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

उसळीनंतर चांदी आपटली

गेल्या आठवड्यात चांदीने 5500 रुपयांची भरारी घेतली होती. या आठवड्यात चांदी 1000 रुपयांनी वधारली. तर 1800 रुपयांची घसरण झाली. 10 जून रोजी चांदीचा भाव 200 रुपयांनी वाढला. 11 जून रोजी चांदीत 1200 रुपयांची घसरण झाली. 12 जूनला 800 रुपयांनी किंमती वधारल्या. तर 13 जून रोजी भाव 600 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,700 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी घसरली. 24 कॅरेट सोने 71,513 रुपये, 23 कॅरेट 71,227 रुपये, 22 कॅरेट सोने 65,506 रुपये झाले. 18 कॅरेट 53,635 रुपये, 14 कॅरेट सोने 41,835 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 87,847 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता

Follow Us
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.