AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | सोने चमकले, चांदी लकाकली, असे वधारले सराफा बाजारात भाव

Gold Silver Rate Today 22 February 2024 | या आठवड्यात सोने आणि चांदीत चढउताराचे सत्र दिसून आले. गेल्या आठवड्याच्या शेवटी दरवाढ झाली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला मौल्यवान धातू महागले तर मंगळवारी किंमतीत घसरण झाली होती. आता पुन्हा दोन्ही धातूंनी आगेकूच केली आहे. सराफा बाजारात जाण्यापूर्वी भाव जाणून घ्या..

Gold Silver Rate Today | सोने चमकले, चांदी लकाकली, असे वधारले सराफा बाजारात भाव
| Updated on: Feb 22, 2024 | 8:30 AM
Share

नवी दिल्ली | 22 February 2024 : सराफा बाजारावर जागतिक बाजाराचा प्रभाव दिसून येत आहे. कच्चे तेल, अमेरिकन महागाई आणि बेरोजगारीचा दर, जागतिक गुतवणूकदारांचा कल, चीनची आर्थिक परिस्थितीत तर जपानसह युरोपातील देशांवर मंदीचे सावट या सर्वांचा परिणाम सध्या सराफा बाजारावर दिसून येत आहे. त्यामुळे किंमतीत सातत्याने चढउताराचे सत्र दिसून येत आहे. एका दिवसातच किंमतीत बदलाचे सत्र दिसून येत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला मौल्यवान धातूत दरवाढ झाली. नंतर भाव घसरले. आता पुन्हा किंमतीत वाढ झाली. अशा आहेत सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 22 February 2024)

  1. सोन्यात चढउताराचे सत्र – गेल्या आठवड्यात सोने स्वस्त झाले. तर आठवड्याच्या अखेरीस सोने चमकले. 16 फेब्रुवारी रोजी 200 तर 17 फेब्रुवारी रोजी 100 रुपयांची वाढ झाली. तर 19 फेब्रुवारी रोजी सोने 270 रुपयांनी वधारले. 20 फेब्रुवारी रोजी भाव 100 रुपयांनी कमी झाला. 21 फेब्रुवारी रोजी सोने 250 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,890 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  2. स्वस्ताईनंतर चांदी महागली – चांदीत गेल्या काही दिवसांपासून चढउताराचे सत्र आहे. 16 फेब्रुवारी रोजी 1100 तर 17 फेब्रुवारी रोजी 900 रुपयांनी चांदी महागली. या आठवड्याच्या सुरुवातीला 20 फेब्रुवारी रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. 21 फेब्रुवारी रोजी 200 रुपयांनी चांदी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,700 रुपये आहे.
  3. 14 ते 24 कॅरेटचा भाव काय – इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी वधारले. 24 कॅरेट सोने 62,258 रुपये, 23 कॅरेट 62,009 रुपये, 22 कॅरेट सोने 57,028 रुपये झाले. 18 कॅरेट 46,694 रुपये, 14 कॅरेट सोने 36,421 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,708 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
  4. किंमती मिस्ड कॉलवर – 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...