सोने -चांदीचा डाबडुबलीचा खेळ; आज झाले महाग, एक दिवसापूर्वी होती स्वस्ताई

Gold Silver Rate Today 28 March 2024 | सोने आणि चांदीत या आठवड्यात चढउताराचे सत्र दिसून आले. गेल्या आठवड्यात 21 मार्च रोजी गुरुवारी किंमतींनी रेकॉर्ड केला होता. या आठवड्यात मौल्यवान धातूत चढउताराचे सत्र आहे. सोमवार, मंगळवारी दिलासा दिल्यानंतर सोने वधारले आहे तर चांदी स्वस्त झाली आहे.

सोने -चांदीचा डाबडुबलीचा खेळ; आज झाले महाग, एक दिवसापूर्वी होती स्वस्ताई
सोने महाग, चांदी झाली स्वस्त
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 8:36 AM

मार्च महिन्यात सोने आणि चांदीने कमाल उसळी घेतली. या महिन्यातील सुरुवातीचे दहा दिवस आणि गेल्या आठवड्यातील 21 मार्च रोजी किंमतींनी नवीन रेकॉर्ड केला. मोठ्या उसळीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. 21 मार्च नंतर सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने चढउताराचे सत्र दिसून येत आहे. या आठवड्यात सुरुवातीला सोमवार, मंगळवार किंमतीत मोठा बदल दिसला नाही. आता सोन्याने दरवाढीची सलामी दिली. तर चांदीत घसरण झाली. गेल्या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी तर चांदी 2800 रुपयांनी महागली. आता सोने आणि चांदीचा (Gold Silver Price Today 28 March 2024) असा आहे भाव?

सोन्याची उसळी

या आठवड्यात सोन्यात सोमवारी कोणताच बदल दिसला नाही. तर 26 मार्च रोजी सोन्यात 100 रुपयांची घसरण दिसून आली. 27 मार्च रोजी किंमतीत 200 रुपयांची वाढ झाली. 21 मार्चच्या उसळीनंतर सोन्याच्या किंमतीत चढउताराचे सत्र सुरु आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 61,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 67,080 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी 600 रुपयांनी उतरली

21 मार्च रोजी चांदी 1500 रुपयांनी महागली होती. त्यानंतर चढउताराचे सत्र सुरु आहे. 22 मार्च रोजी चांदी 2000 रुपयांनी स्वस्त झाली होती. 25 मार्च रोजी चांदी 300 रुपयांनी वधारली. तर मंगळवारी 26 मार्च रोजी किंमती तितक्याच कमी झाल्या. 27 मार्च रोजी 300 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 77,200 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने वधारले तर चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 66,834 रुपये, 23 कॅरेट 66,566 रुपये, 22 कॅरेट सोने 61,220 रुपये झाले.18 कॅरेट 50126 रुपये, 14 कॅरेट सोने 39,098 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,997 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित

ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते

शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'.
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?.
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता.
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'.
एक अफवा,11 जणांचा मृत्यू, पुष्पकमधून उड्या, दुसऱ्या बाजून ट्रेनन चिरडल
एक अफवा,11 जणांचा मृत्यू, पुष्पकमधून उड्या, दुसऱ्या बाजून ट्रेनन चिरडल.