AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 30 January 2025 : सोन्याचा डबल धमाका, ग्राहकांचा काळजाचा चुकला ठोका, चांदीचा दिलासा, भाव काय?

Gold Silver Rate Today 30 January 2025 : या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने नरमाईचा सुरू आवळला तर आता तिसऱ्या दिवशी सोन्याने डबल धमाका केला, किंमत इतकी वाढली की ग्राहकांचा काळजा ठोका चुकला. चांदीने सध्या दिलासा दिला. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या अशा आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 30 January 2025 : सोन्याचा डबल धमाका, ग्राहकांचा काळजाचा चुकला ठोका, चांदीचा दिलासा, भाव काय?
सोने-चांदीची किंमत
| Updated on: Jan 30, 2025 | 8:29 AM
Share

या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. सोन्याने दोन दिवसात नरमाईचा सुरू आवळला. तर तिसर्‍या दिवशी सोन्याने डबल धमाका केला, किंमत इतकी वाढली की ग्राहकांचा काळजा ठोका चुकला. चांदीने सध्या दिलासा दिला. चांदीत या तीन दिवसात दरवाढ केली नाही. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या अशा आहेत किंमती, आणि एक किलो चांदीच्या आता अशा आहेत किंमती. (Gold Silver Price Today 30 January 2025 )

सोन्याची गरुड भरारी

सोन्याने मागील दोन आठवड्यात 3000 रुपयांची भरारी घेतली. या सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे 170 आणि 320 रुपयांची घसरण झाली होती. बुधवारी 29 जानेवारी रोजी सोन्याने 920 रुपयांचा धमाका केला. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 76,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 83,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचा ग्राहकांना दिलासा

पंधरवाड्यात चांदी 4 हजार रुपयांनी महागली होती. त्यानंतर 18 ते 23 जानेवारीपर्यंत भावात बदल झाला नाही. तर 24 जानेवारीला 1 हजार रुपयांनी चांदी महागली होती. 27 जानेवारी रोजी त्यात 1 हजार रुपयांची घसरण झाली. दोन दिवसात कोणताही बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 80,975, 23 कॅरेट 80,651, 22 कॅरेट सोने 74,173 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 60,731 रुपये, 14 कॅरेट सोने 47,370 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,680 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...