AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिव नाडर यांनी कन्येला दिले असे गिफ्ट, मुकेश अंबानी यांनी देखील अजून इशाला दिले नाही…

देशाच्या टॉप-5 टेक कंपन्यापैकी एक असलेल्या HCL Tech चे संस्थापक हुरुन यांच्या यादीत काही वर्षांपासून सर्वात मोठे दानशूर म्हणून पुढे आले आहेत. परंतू त्यांनी त्यांची कन्या रोशनी नाडर मल्होत्रा हीला असे गिफ्ट दिले आहे की जे आतापर्यंत मुकेश अंबानी देखील त्यांच्या कन्येला देऊ शकलेले नाहीत.

शिव नाडर यांनी कन्येला दिले असे गिफ्ट, मुकेश अंबानी यांनी देखील अजून इशाला दिले नाही...
shiv nadar and roshani malhotra, mukesh ambani, isha ambani
| Updated on: Mar 08, 2025 | 2:44 PM
Share

HCL Tech चे संस्थापक शिव नाडर यांनी महिला दिनाचे औचित्य साधत आपल्या कन्या रोशनी नाडर हिला एक अनोखे गिफ्ट दिले आहे. ज्याची लोक केवळ अपेक्षाच करीत असतात. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी देखील त्यांची कन्या इशा हिला असे गिफ्ट अद्याप देऊ शकलेले नाहीत. वाचा ही बातमी….

एचसीएल टेक्नॉलॉजी देशातील टॉप-5 टेक कंपन्यापैकी एक आहे. ही देशाची सर्वात मोठी प्रमोटर बॅक्ड कंपन्यांपैकी एक आहे. शिव नाडर हळूहळू कंपनीचा सर्व सूत्रे त्यांची कन्येच्या हातात सोपवत आहेत. त्यांच्या कन्या रोशनी नाडर एचसीएलच्या दोन प्रमोटर कंपन्यात मोठी हिस्सेदारी गिफ्ट दिले आहे.

रोशनी नाडर एचसीएलमध्ये मोठी भागीदार

शिव नाडर यांनी आपल्या उत्तराधिकारी योजनेंतर्गत एचसीएल टेकच्या दोन प्रमोटर कंपन्या ‘वामा सुंदरी इंव्हेस्टमेंट’ आणि ‘एचसीएल कॉर्पोरेशन’ मध्ये आपली 47% हिस्सा रोशनी नाडर मल्होत्रा हीला गिफ्ट डीड च्या अंतर्गत ट्रान्सफर केला आहे. यानंतर आता शिव नाडर यांची स्वत:ची हिस्सेदारी घटून आता केवळ 4 टक्के राहीली आहे.

एवढेच नाही तर कंपन्यात रोशनी नाडर मल्होत्रा यांची हिस्सेदारी वाढून आता 57.33 टक्के झाली आहे. तसेच बोर्डाचे निर्णय घेण्यातही त्यांची व्होटींग पॉवर देखील वाढली आहे. डिसेंबर 2024 च्या डेटा नुसार या दोन प्रमोटर ग्रुप कंपन्यांची एचसीएल टेक्नॉलॉजीसमध्ये एकूण हिस्सेदारी 44.34 टक्के आहे. याशिवाय शिव नाडर आणि रोशनी नाडर मल्होत्रा देखील एचसीएल टेक्नॉलॉजीसच्या प्रमोटर्स आहेत. त्यांच्या जवळ एचसीएल टेक मध्ये 1 टक्के थेट हिस्सेधारी देखील आहे.

मुकेश अंबानी यांची तीन मुलांसाठी उत्तराधिकारी योजना

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी देखील आपल्या तीन मुलांसाठी उत्तराधिकारी योजना बनविली आहे. यात इशा अंबानी हिला रिटेल, आकाश अंबानी याला टेलीकॉम आणि अनंत अंबानी यााल एनर्जी बिझनस सोपविला आहे. परंतू आतापर्यंत त्यांनी आपल्या बिझनसची संपूर्ण वाटणी मुलांमध्ये केलेली नाही. तसेच शेअर होल्डींगची देखील वाटणी केलेली नाही.

रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये प्रमोटर ग्रुपची भागीदारी 50 टक्क्यांहून अधिक आहे.परंतू वैयक्तिकरित्या कोकिला बेन यांच्याजवळ 0.24 टक्के आणि मुकेश, नीता, इशा, आकाश आणि अनंत प्रत्येकाजवळ 0.12 टक्के हिस्सेदारी या कंपन्यात आहे. तेवढेच व्होटींग राईट त्यांच्याकडे आहेत.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.