विलीनीकरणानंतर लक्ष्मीविलास बँकेच्या ग्राहकांना किती मिळणार व्याज? DBS ने बँकेने दिली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डीबीएसमध्ये विलीनीकरणावर सरकारने मंजूरी दिली.

विलीनीकरणानंतर लक्ष्मीविलास बँकेच्या ग्राहकांना किती मिळणार व्याज? DBS ने बँकेने दिली माहिती
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 7:48 PM

नवी दिल्ली : स्वातंत्र्यपूर्वीपासून सुरू असलेली लक्ष्मीविलास ही बँक (Lakshmi Vilas Bank) आता इतिहास जमा झाली आहे. पण कर्जाच्या संकटामुळे कंटाळून अखेर 27 नोव्हेंबर रोजी बँकेनं काम थांबवलं. यानंतर सिंगापूरच्या डीबीएस बँकेच्या भारतीय सहायक कंपनी डीबीएस इंडिया बँके (DBS Bank) सोबत लक्ष्मीविलास बँकेचं विलीनीकरण झालं. यामुळे ग्राहकांमध्ये आता किती व्याज मिळणार याची उत्सुकता आहे लागली आहे. पण सध्या लक्ष्मीविलास बँकेच्या ग्राहकांसाठी बचत खाते आणि मुदत ठेवींवरील व्याज दर बदललेले नाहीत अशी माहिती डीबीएस बँक इंडियाने दिली आहे. (How much interest will Lakshmi Vilas Bank customers get after merger answer by DBS bank)

डीबीएस बँकेच्या म्हणण्यानुसार, विलीनीकरणानंतरही लक्ष्मीविलास बँकेच्या ग्राहकांसाठी सर्व बँकिंग सेवा पूर्वीप्रमाणेच असणार आहेत. जोपर्यंत नवीन नोटिस जारी होत नाही तोपर्यंत जुना व्याज दर बचत खात्यावर आणि एफडीवर उपलब्ध असेल अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे. इतकंच नाहीतर लक्ष्मीविलास बँकेवरील बंदीसुद्धा 27 नोव्हेंबरपासून काढून घेण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डीबीएसमध्ये विलीनीकरणावर सरकारने मंजूरी दिली. 27 नोव्हेंबरला रिझर्व्ह बँकेने डीबीएस बँक इंडिया लिमिटेडमध्ये विलीनीकरणाची घोषणा केली होती. लक्ष्मीविलास बँकेच्या सर्व शाखा 27 नोव्हेंबरपासून डीबीआयएलच्या शाखा म्हणून काम करतील असं रिझर्व्ह बँकेने त्यांच्या निवेदनात म्हटलं होतं. (How much interest will Lakshmi Vilas Bank customers get after merger answer by DBS bank)

लक्ष्मी विलास बँकेला डीबीएस इंडियामध्ये विलीन होण्यापूर्वी 318 कोटी रुपयांचं टिअर-2 बेसल-3 बाँडला राईट ऑफ करण्यासाठी सांगण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँकेने बँकिंग रेग्युलेशन कायद्याच्या कलम 45 चे हवाला देऊन हे निर्देश दिले होते. यामुळे या बाँडमधील गुंतवणूकदारांचं नुकसान झालं आहे.

इतर बातम्या –

Bank Holidays in December 2020 | बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, डिसेंबरमध्ये तब्बल 14 दिवस बँका बंद

डिसेंबरपासून ATM मधून पैसे काढण्याचा नियम बदलणार, कॅश काढताना द्यावी लागणार ‘ही’ माहिती

(How much interest will Lakshmi Vilas Bank customers get after merger answer by DBS bank)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.