EPFO मधून एका वेळी किती पैसे काढता येतात?, पाहा संपूर्ण अपडेट
EPFO म्हणजेच तुमच्या प्रोव्हीडंड फंडाचे पैसे काढण्याचे नियम आता सोपे केले आहेत. जर तुमची नोकरी गेली असेल किंवा तुम्ही नोकरी सोडली असेल आणि तुमच्याकडे काही काम नसेल तर तुमच्या पीएफचे सगळे पैसे दोन महिन्यात काढू शकता. तर काही प्रकरणात यासाठी १२ महिन्यांचा कालावधी आहे.

EPFO म्हणजे जेथे तुमचे प्रोव्हीडन्ट फंडाचे पैसे जमा होतात. अनेक गरजेच्या वेळी किंवा इमर्जन्सीला तुम्हाला तुमच्या प्रोव्हीडन्टचे पैसे काढायचे असतात. समजा तुम्हाला एक लाखाची गरज आहे. आणि तुम्ही तुमच्या पीएफमधून पैसे काढण्यासाठी अर्ज केला. परंतू तुम्हाला प्रत्यक्षात ६० हजार मिळतात. तेव्हा तुम्ही विचार करता की तुम्ही एक लाख मागितले होते मग ६० हजार का मिळाले असा प्रश्न तुमच्या मनात येतात. चला तर पाहूयात EPFO मधून तुम्ही किती पैसे काढू शकता.
तुम्ही तुमच्या पीएफ (EPF) गरजेनुसार पैसे काढू शकता.,ज्यात काही वेळा ( आजारपण, लग्न, किंवा घर खरेदी ) १०० टक्क्यांपर्यंत रक्कम मिळते. परंतू काही वेळा ७५ टक्के रक्कम काढता येते. निवृत्तीनंतर मात्र तुम्ही संपू्र्ण रक्कम काढू शकता. अलिकडे बदललेल्या नियमात पैसे काढणे सोपे केले आहे. १२ वर्षांची सेवा झाली असेल तर १०० टक्के रक्कम काढता येणार आहे.
घर खरेदी आणि दुरुस्तीसाठी किती ?
जर तुम्ही घर खरेदी करायला जात आहात किंवा तुमच्या घराची दुरुस्ती करु इच्छीता तर तुम्ही तुमच्या प्रोव्हीडन्ट फंडातून ९० टक्के रक्कम काढू शकता. समजा तुमच्या खात्यात १ लाख रुपये आहेत. तर तुम्ही ९० हजारापर्यंत या कामासाठी काढू शकता.
आजारपणा किती पैसे काढता येतात –
जर तुमच्या कुटुंबातील कोणी आजारी असेल तर तुम्ही इलाजासाठी १०० टक्के पूर्ण रक्कम काढू शकता. तसेच तुमची मुले किंवा भाऊ – बहिणीचे शिक्षण किंवा लग्नासाठी तुम्ही तुमचे योगदान + व्याजाचे ७५ टक्क्यांपर्यंत पैसे काढू शकता.
नोकरी करताना किती पैसे काढू शकता ?
जेथे तुम्ही काम करत आहात. तेथे तुम्ही १२ महिन्यांचा काळ पूर्ण केला असेल तर तुम्ही जमलेल्या रकमेच्या २५ टक्के वगळून उर्वरित पैसे काढू शकता. समजा तुमच्या खात्यात १ लाख रुपये असेल तर ७५ हजार रुपये काढू शकता.
नोकरी सोडल्यानंतर किती पैसे काढता येतात ?
जर तुम्ही नोकरी सोडली आहे किंवा तुमची नोकरी गेली असेल कर तुमच्याकडे कोणतेही काम नसेल तर या स्थितीत तुम्ही तुमच्या प्रोव्हीडंड फंडाचे संपूर्ण पैसे दोन महिन्यानंतर काढू शकता. काही प्रकरणात यासाठी १२ महिन्यांचा वेळमर्यादा निश्चित केली आहे. जर तुम्ही निवृत्त झाला असाल तर अशा स्थितीत तुम्ही संपूर्ण पैसे काढू शकता. EPFO नव्या नियमांर्गत आता १२ महिन्यांचा सेवा पूर्ण केल्यानंतर देखील १०० टक्के रक्कम काढता येणे शक्य आहे ( काही अटी सह ) याआधी यासाठी ५ ते ७ वर्षांची नोकरी पूर्ण करण्याची अट होती.
