देशात ‘या’ ठिकाणी पेट्रोल शंभरी पार, तर जगात ‘या’ ठिकाणी पेट्रोल 2 रुपये प्रतिलीटर!

देशात 'या' ठिकाणी पेट्रोल शंभरी पार, तर जगात 'या' ठिकाणी पेट्रोल 2 रुपये प्रतिलीटर!

जगात असा एक देश आहे, जिथे पेट्रोल 2 रुपये प्रतिलीटरपेक्षाही कमी दराने विकले जात आहे. (India Venezuela petrol rate)

prajwal dhage

|

Jan 26, 2021 | 8:59 AM

नवी दिल्ली : जगातील प्रथम क्रमांकाचा तेल उत्पादक देश सौदी अरेबियाने आपल्या उत्पादनात कपात केल्यामुळे जगभरात इंधन महागले आहे. आपल्या देशात काही ठिकाणी पैट्रोल आणि डिझेलने शंभरी पार केली आहे. तर जगात असा एक देश आहे, जिथे पेट्रोल 2 रुपये प्रतिलीटरपेक्षाही कमी दराने विकले जात आहे. जाणून घेऊयात अशाी कोणती ठिकाणं आहेत. (in India petrol rate crosses 100 in Venezuela petrol rate is below the 2 rupees)

श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल शंभरी पार

वेगवेगळ्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात. स्थानिक करप्रणालीनुसार हे दर ठरतात. त्यामुळे आपल्याला राज्यांतर्गत तसेच शहरांतर्गतसुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढउतार दिसतो. दिल्लीत पेट्रोलचे दर 35 पैशांनी वाढले असून सध्या पेट्रोल 86.05 रुपये प्रतिलीटर दराने विकले जात आहे. तर, मुंबईत पेट्रोल 34 पैशांनी महागले असून पेट्रोलचा दर 92.62 रुपयांवर पोहोचला आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगरात साध्या पेट्रोलचा दर 97.76 रुपये प्रतिलीटर आहे. तर प्रिमियम पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली असून सध्या दर 100.51 प्रतीलीटरवर पोहोचला आहे. जागतिक पातळीवर तेल महागल्यामुळे पेट्रोलच्या किमतीत ही वाढ होत असल्याचे बोलले जात आहे.

व्हेनेझुएला देशात पेट्रोल दोन रुपये प्रतिलीटरपेक्षाही कमी

देशातील श्रीगंगानगर सारख्या भागात पेट्रोलने शंभरी पार केली आहे. तर जगात असे काही देश आहेत. ज्या देशांमध्ये पेट्रोल अत्यंत कमी दराने विकले जात आहे. व्हेनेझुएला देशात पेट्रोलची किंमत दोन रुपयांपेक्षाही कमी झाली आहे. येथे पेट्रोल 1.46 रुपये प्रतिलीटर दराने विकले जात आहे. डॉलरमध्ये सांगायचे झाल्यास हा दर फक्त 0.02 डॉलर एवढा आहे.

भारतापेक्षा पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त

पाकिस्तानमध्ये भारताच्या तुलनेत पेट्रोल कित्येक टक्क्यांनी स्वस्त आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये पेट्रोल 40 ते 45 टक्के स्वस्त आहे. येथे सध्या पेट्रोलचा दर 49.87 रुपये प्रतिलीटर आहे.

पेट्रोल महागण्याचं कारण काय?

भारतात दिवसेंदिवस पेट्रोल महाग होत चालले आहे. या महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. देशातील करप्रणाली हे या महागाईचे मुख्य कारण आहे. विशेष म्हणजे आपल्या देशात प्रत्येक राज्यात वेगवेळ्या प्रकारचे कर आहेत. त्यामुळे भारत सरकार आणि राज्य सरकार अशा दोनी संस्थांकडून वेगवेगळे कर आकारले जातात. याच कराणामुळे आपल्या देशात पेट्रोल महाग आहे.

संबंधित बातम्या :

Petrol-Diesel Price Today | प्रजासत्ताक दिनालाही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, पाहा तुमच्या शहरातील दर

(in India petrol rate crosses 100 in Venezuela petrol rate is below the 2 rupees)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें