7 शेअर फ्री, पहिल्यांदाच बोनस देणार, हा स्टॉक गुंतवणूकदारांना मालामाल करणार

Multibagger Share : इंडो कॉटस्पिन लिमिटेड या कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहेत. आज, अनेक गुंतवणूकदारांच्या या शेअरवर लक्ष आहे. या शेअरमध्ये 2 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसली. हा शेअर 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत आहे.

7 शेअर फ्री, पहिल्यांदाच बोनस देणार, हा स्टॉक गुंतवणूकदारांना मालामाल करणार
मल्टिबॅगर स्टॉक
Follow us
| Updated on: Aug 13, 2024 | 2:19 PM

टरशेअर बाजारात चढउताराचे सत्र सुरू आहे. शेअर बाजारातील भरती-ओहोटीत पण काही स्टॉक कमाल दाखवत आहेत. हा मल्टिबॅगर स्टॉक पण तेजीच्या लाटेवर स्वार झाला आहे. इंडो कॉटस्पिन लिमिटेडच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या सध्या उड्या पडल्या आहेत. या शेअरमध्ये 2 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसली. हा शेअर 96.69 रुपयांच्या इंट्रा डे उच्चांकावर पोहचला आहे. गेल्या एका महिन्यात हा शेअर 25 टक्क्यांपर्यंत आणि सहा महिन्यात 120 टक्क्यांपर्यंत वधारला. कंपनीने नुकताच 7:10 या प्रमाणात बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. म्हणजे प्रत्येक 10 शेअर मागे ही कंपनी 7 शेअर मोफत देणार आहे.

कंपनीने केली मोठी घोषणा

इंडो कॉटस्पिन लिमिटेडने शेअर बाजाराला याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, संचालक मंडळाने गुंतवणूकदारांना 7:10 च्या प्रमाणात बोनस शेअर देण्यास मंजुरी दिल्याची माहिती दिली. त्यानुसार, कंपनी गुंतवणूकदारांना 29,40,350 बोनस इक्विटी शेअर देणार आहे. प्रत्येक 10 शेअर मागे कंपनी गुंतवणूकदारांना 7 शेअर देईल. अजून त्यासाठीची रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आलेली नाही.

हे सुद्धा वाचा

कंपनी करते तरी काय?

Indo Cotspin Ltd कापडी चटाई आणि इतर जिओ टेक्सटाईलमधील प्रमुख निर्यातक, उत्पादक, व्यापार करणारी कंपनी आहे. कंपनीची स्थापना 1955 साली झालेली आहे. स्थापनेनंतर कंपनीने पहिल्यांदा गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीच महसूल जून 2024 च्या तिमाहीत 5.15 टक्के घसरला, तो 3.07 कोटी रुपयांवर आला. जून 2023 च्या तिमाहीत महसूलाचा आकडा 3.24 कोटी रुपये इतका होता. जूनच्या तिमाहीत कंपनीचा फायदा 159.11 टक्के वाढला. कंपनीचा EBITDA ह 17.39 टक्के वाढला. त्यात गेल्या एक दोन वर्षात चढउतार दिसला.  आता कंपनीने गुंतवणूकदारांना लॉटरी लावली आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.