AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Reliance, TATA नाही तर ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना बनवते सर्वाधिक करोडपती! या देशी कंपनीला म्हणतात CEO फॅक्ट्री

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, यावेळी आपल्या कर्मचाऱ्यांना करोडपती क्लबमध्ये ITC सर्वात पुढे आहे. कंपनीचे 153 कर्मचारी असे आहेत, ज्यांची पगार 1 कोटीपेक्षा अधिक आहे.

Reliance, TATA नाही तर ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना बनवते सर्वाधिक करोडपती! या देशी कंपनीला म्हणतात CEO फॅक्ट्री
| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 2:04 PM
Share

मुंबई : चांगल्या शिक्षणानंतर चांगली नोकरी गरजेची असते. अनेक लोकांच्या मनात चांगल्या नोकरीचा अर्थ म्हणजे तगडी सॅलरी. देशातील सर्वाधिक पगार देणारी कंपनी कोणती हे तुम्हाला माहिती आहे का? इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, यावेळी आपल्या कर्मचाऱ्यांना करोडपती क्लबमध्ये ITC सर्वात पुढे आहे. कंपनीचे 153 कर्मचारी असे आहेत, ज्यांची पगार 1 कोटीपेक्षा अधिक आहे. (ITC company makes its employees millionaires, while Hindustan Unilever is called the CEO’s factory)

मागील वर्षी ITCने 39 अशा मॅनेजर्सची हायरिंग केली आहे, ज्यांना 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक पगाराची ऑफर दिली गेली आहे. सुरुवातीला अशी कंपनी HUL होती. गेल्या वर्षी 2021 मध्ये हिंदुस्तान युनीलिव्हरच्या करोडपती क्लबमध्ये 123 कर्मचारी राहिले होते जी संख्या सुरुवातीला 129 होती. आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये ITC चे फक्त 23 मॅनेजर असे होते, ज्यांची पगार 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक होती. तर HUL मध्ये करोडपती मॅनेजर्सची संख्या 169 कोटी रुपये होती. ITCच्या करोडपती क्लबची संख्या वाढल्यानंतर असं सांगितलं जात आहे की कंपनीने 2018 मधअये ESOP स्कीमचा पर्याय सादर केला होता. त्यामुळे आता फक्त 1 टक्के मॅनेजर्स असे आहेत जे ESOP योजनेत येतात. 2017 मध्ये अशा मॅनेजर्सची संथ्या 11 ठक्के होती.

टर्नओव्हरच्या तुलनेत पगारावर सर्वात कमी खर्च करते ITC

अहवालात एक आश्चर्यजनक खुलासा करण्यात आला आहे. टर्नओव्हरच्या तुलनेत कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या बाबतीत ITC आपल्या उद्योगात सर्वात कमी आहे. कंपनी आपल्या टर्नओव्हरच्या तुलनेत फक्त 4.2 टक्के कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च करते. मात्र, करोडपती क्लबमध्ये सर्वात पुढे आहे. ITCचा उद्योग FMCG सह सिगरेट, पॅकेज फूड्स, पर्सनल केअर, स्टेशनरी, अगरबत्तीचा आहे. यासह ही कंपनी देशातील दुसरी सर्वात मोठी हॉटेल चैनही पाहते. अॅग्री बिझनेस आणि पेपरबोर्ड मार्केटमध्ये ही देशातील सर्वात मोठी खासगी कंपनी आहे. त्यामुळे विविध उद्योगातील मॅनेजर्सची संख्या इथं जास्त आहे.

ESOP योजना हटवल्यानंतर पगारात मोठी वाढ

ITCचा मेजर शेअर होल्डर BAT (ब्रिटिश अमेरिकन टोबॅको)ने 2018 मध्ये ESOP विरोधात वोटिंग केलं होतं. या घटनेनंतर 2019 मध्ये कंपनीने पगाराच्या ढाच्यामध्ये बदल केला. 2020-21 मध्ये नवीन स्ट्रक्चर लागू करण्यात आलं होतं. त्यामुळेचत अनेक मॅनेजर्स असे आहेत की एकूण remuneration मध्ये 51 टक्क्यांपर्यंची वाढ आहे.

HUL का आहे CEO Factory?

HUL देशातील एक मोठी एफएमसीजी कंपनी आहे. आपल्या देशात या कंपनीला CEO Factory म्हटलं जातं. विविध अभ्यासांचा हा दावा आहे की या कंपनीत कामाची सुरुवात करणारे जवळपास 400 कर्मचारी विविध कंपन्यांमध्ये CEO बनवले आहेत. MBA चं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हिंदुस्तान यूनीलिवर प्रमुख पसंतीची कंपनी असते.

संबंधित बातम्या :

LICची दमदार पॉलिसी: फक्त 1302 रुपये मंथली प्रीमियमवर मिळतात 27.60 लाख रुपये!

GST Compensation: केंद्राकडून राज्यांना 75,000 कोटी जाहीर, पुढचा हप्ता कधी मिळणार?

ITC company makes its employees millionaires, while Hindustan Unilever is called the CEO’s factory

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.