AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार देणार 5 लाख लिमिटचं क्रेडिट कार्ड, व्याज 4 टक्के, जाणून घ्या..

आता खुद्द सरकारच तुम्हाला क्रेडिट कार्ड देणार आहे. 2025 च्या अर्थसंकल्पात सरकारने किसान क्रेडिट कार्ड (KCC) च्या कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली. शेतकऱ्यांना अधिकाधिक आर्थिक मदत देणे, डिजिटल फायनान्सला चालना देणे आणि छोट्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

सरकार देणार 5 लाख लिमिटचं क्रेडिट कार्ड, व्याज 4 टक्के, जाणून घ्या..
Kisan credit cardImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Mar 04, 2025 | 1:57 PM
Share

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये किसान क्रेडिट कार्ड (KCC) च्या कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा भागविणे, कृषी क्षेत्रात आर्थिक प्रगतीसह ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजना म्हणजे काय?

किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना 1998 मध्ये सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांना कमी व्याजदराने अल्प मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे, त्यांना बियाणे, खते, कृषी अवजारे व इतर गरजांसाठी निधी सहज उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

मार्च-एप्रिल 2024 पर्यंत या योजनेअंतर्गत 7.75 कोटी सक्रिय खाती होती आणि एकूण 9.81 लाख कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. यावरून ही योजना शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाची आहे, हे दिसून येते.

किसान क्रेडिट कार्ड योजनेत कोणते बदल केले?

यंदाच्या अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्ड योजनेत कर्जाची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. या बदलामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक पाठबळ मिळेल आणि डिजिटल आर्थिक समावेशना देखील चालना मिळेल.

किसान क्रेडिट कार्ड कसे कार्य करते?

किसान क्रेडिट कार्डमध्ये पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर (PIN) आणि इंटरनॅशनल आयडेंटिफिकेशन नंबर (IIN) असतो. हे मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड म्हणून काम करते.

आता शेतकरी ATM मधून सहज पैसे काढण्यासाठी या कार्डचा वापर करू शकतील, ज्यामुळे गरजेच्या वेळी सहज कर्ज उपलब्ध होईल. सुधारित व्याज अनुदान कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना आता पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे.

अर्थसंकल्प 2025 मध्ये किसान क्रेडिट कार्ड योजनेला मुदतवाढ

यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ 7.7 कोटी शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली. याचा फायदा विशेषतः लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार आहे, तसेच पशुपालन व मत्स्यव्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजनेचे नवे फायदे

अर्थसंकल्प 2025 नुसार अतिरिक्त 1 कोटी शेतकऱ्यांना या योजनेच्या कक्षेत आणण्याची सरकारची योजना आहे. याचा फायदा आतापर्यंत कर्ज आणि आर्थिक मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही होणार आहे.

किसान क्रेडिट कार्डवर सबसिडी

किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर सवलतीचा व्याजदर 7 टक्के आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने वेळेत कर्जाची परतफेड केली तर त्याला 3 टक्के व्याज अनुदान मिळते, ज्यामुळे अंतिम व्याज दर 4 टक्क्यांपर्यंत कमी होतो.

मात्र, तीन लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या कर्जावर विविध बँकांचे व्याजदर लागू असतील, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती घ्यावी किंवा कस्टमर केअरशी संपर्क साधावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.