तुमच्या आईला आरोग्य विम्याची सर्वाधिक गरज का आहे आणि तुम्ही योग्य विमा खरेदी करण्याची खातरजमा कशी कराल?

मातांना जेव्हा स्वतःबद्दल निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा त्या दिरंगाई करतात, असे दिसून आले आहे. त्या घरात आणि कामामध्ये इतक्या गुंतलेल्या असतात की, त्या स्वतःबद्दल विसरून जातात. अलीकडेच झालेल्या अभ्यासात असेही दिसून आले आहे की महिलांमध्ये, वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असलेल्या दीर्घकालीन आजारांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे योग्य आरोग्य विमा योजना असणे आवश्यक असते, जेणेकरून कोणताही गंभीर आजार झाला तरी त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर गदा येणार नाही.

तुमच्या आईला आरोग्य विम्याची सर्वाधिक गरज का आहे आणि तुम्ही योग्य विमा खरेदी करण्याची खातरजमा कशी कराल?
Health-Insurance
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Oct 04, 2021 | 11:59 AM

मुंबई : मातांना जेव्हा स्वतःबद्दल निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा त्या दिरंगाई करतात, असे दिसून आले आहे. त्या घरात आणि कामामध्ये इतक्या गुंतलेल्या असतात की, त्या स्वतःबद्दल विसरून जातात. अलीकडेच झालेल्या अभ्यासात असेही दिसून आले आहे की महिलांमध्ये, वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असलेल्या दीर्घकालीन आजारांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे योग्य आरोग्य विमा योजना असणे आवश्यक असते, जेणेकरून कोणताही गंभीर आजार झाला तरी त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर गदा येणार नाही.

भारतात महिलांना सामान्यपणे होणाऱ्या आजारांचा वैद्यकीय खर्च वाढलेला असणे या अजून एका कारणासाठी तुमच्या आईसाठी आरोग्य विमा असणे आवश्यक आहे. हे आजार सर्व वयोगटातील महिलांमध्ये आढळतात, पण प्रसूतीनंतर आणि वाढत्या वयानुसार त्याचे गांभीर्य वाढत जाते.

भारतात मातांना बहुधा आरोग्य विमा योजनेतील डिपेंडंट (अवलंबून व्यक्ती) म्हणून संरक्षण मिळालेले असते आणि ती महिला वर्किंग प्रोफेशनल असेल तर तिच्या एम्प्लॉयरकडून ऑफर करण्यात आलेल्या ग्रुप हेल्थ इन्श्युरन्सअंतर्गत तिला विमा संरक्षण मिळालेले असते. आपण पहिली परिस्थिती पाहिली तर एखाद्या दुर्दैवी घटनेत तिच्या जोडीदाराला/मुलांना रोजगार गमवावा लागला तर तिलाही विमा संरक्षण गमवावे लागते. त्यामुळे तिच्यासाठी वेगळे विमा संरक्षण असणे आवश्यक ठरते.

स्वतंत्र आरोग्य विमा पॉलिसी लाभदायक असते हे स्पष्ट असले तरी तुमच्या आईला योग्य पॉलिसीअंतर्गत विमा संरक्षण मिळालेले आहे, याची खातरजमा करणे आवश्यक ठरते. खालील मुद्दे तुम्हाला याबाबत मदत करतील :

1. शोधा म्हणजे सापडेल 

कोणत्याही पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याआधी आधी तुमच्या आईला असलेले आजार, आधीपासून असलेले विकार यांची यादी करा आणि तिची सध्याची व संभाव्य आरोग्यस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार उत्पादनाची निवड करा. तुम्ही खूपच व्यस्त असाल किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांनी गोंधळून गेला अशाल तर प्रोफेशनलची मदत घेऊ शकता.

2. आजच घ्या 

शक्य तितक्या लवकर विकत घेणे हिताचे आहे. जसजसे आईचे वय वाढत जाईल आरोग्याला असलेला धोका आणि इन्श्युरन्स प्रीमियम वाढत जातो. त्यामुळे लवकरात लवकर विमा योजना विकत घ्या.

3. कमाल संरक्षण किमान अपवर्जन (एक्स्क्लुजन)

मोठ्या प्रमाणावर एक्स्क्लुजन नसलेल्या पॉलिसींचा शोध घ्या. कारण उद्या, तुमच्या आईला एखादी शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली आणि ती शस्त्रक्रिया पॉलिसीमध्ये समाविष्ट नसेल तर तुम्हाला पॉलिसीचा लाभ घेता येणार नाही. त्याचप्रमाणे वैद्यकीय उपचारांचा वाढता खर्च लक्षात घेता १० लाखापासून २० लाखापर्यंत पॉलिसीची निवड करा.

4. क्लेम सेटलमेंट आणि को-पेमेंट 

नावावरून समजलेच असेल, ज्या विमाकर्त्याचा क्लेम सेटलमेंट रेश्यो जास्त आहे त्याची निवड करा. त्याचप्रमाणे तुमचा को-पेमेंट रेश्यो कमी ठेवा, जिथे बिल देताना तुम्हाला फार त्रास होणार नाही.

5. ज्येष्ठ नागरिक पॉलिसी

तुमची आई ज्येष्ठ नागरिक असेल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या पॉलिसीची तुम्ही निवड करू शकता. नियमित आरोग्य पॉलिसींमध्ये पूर्व-अस्तित्व असलेल्या आजारांचा स्टँडर्ड प्रतीक्षा कालावधी चार वर्षांचा असतो तर ज्येष्ठ नगारिकांसाठी असलेल्या पॉलिसींमध्ये हा कालावधी एक ते दोन वर्षांचा असतो.

6. टॉप अप पॉलिसी

तुम्ही टॉप-अप कव्हरेज घेऊन तुम्ही तुमच्या पॉलिसीअंतर्गत मिळणारे संरक्षण वाढवू शकतात, कारण स्वतंत्र कव्हर्सपेक्षा या पॉलिसी स्वस्त असतात. टॉप अप्स अंतर्गत उपलब्ध असलेले कमाल संरक्षण हे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या पॉलिसीपेक्षा जास्त असते.

आरोग्य विमा खरेदी करणे म्हणजे तुमच्या आईच्या आयुष्याच्या दर्जामध्ये गुंतवणूक करणे. आरोग्याशी संबंधित आकस्मिकतांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी आरोग्य विमान पॉलिसीकडून मिळणाऱ्या संरक्षणाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढ्या लवकर तुमच्या आईसाठी पॉलिसी खरेदी करा, तेवढे जास्त लाभ मिळू शकतील.

– डॉ. श्रीराज देशपांडे, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड

संबंधित बातम्या :

पीएफ अकाऊंटचा UAN नंबर विसरलात का, जाणून घ्या पुन्हा कसा मिळवाल

आयुष्मान भारत योजनेत तुमचे कार्ड बनवता येते का?, या 4 स्टेप्समध्ये जाणून घ्या

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें