Budget 2020: केंद्र सरकार LIC मधील भागीदारी विकणार : अर्थमंत्री निर्मला सीतारमण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी) लोकसभेत अर्थसंकल्प 2020 सादर (Government LIC Partnership) केला. नवीन वर्षातील अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली.

Budget 2020: केंद्र सरकार LIC मधील भागीदारी विकणार : अर्थमंत्री निर्मला सीतारमण
Follow us
| Updated on: Feb 01, 2020 | 6:06 PM

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी) लोकसभेत अर्थसंकल्प 2020 सादर (Government LIC Partnership) केला. नवीन वर्षातील अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली. सरकारी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगममध्ये (LIC) असलेली भागीदारी सरकार विकणार आहे. तसेच आयडीबीआय बँकेतील भागीदारीही सरकार विकणार (Government LIC Partnership) आहे, असं सीतारमण यांनी भाषणात सांगितले.

भारतीय जीवन विमा निगमचा आयपीओ लाँच करण्यात येणार आहे. या माध्यमातून सरकार एलआयसीमध्ये आपली भागीदारी करणार आहे. भारतीय जीवन विमा निगमची भागीदारी विकणार असल्याची मोठी घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षाने याला जोरदार विरोध दर्शवला.

भागीदारीबाबत खुलासा नाही?

सरकार आयडीबीआय बँकेची भागीदारीही खासगी कंपन्यांना विकणार आहे. पण याचे सर्व नियंत्रण सरकारकडे असणार आहे. सरकारकडे याची एकूण किती भागीदारी असणार याबाबत सरकारने अद्याप खुलासा केलेला नाही.

पैसे जमा करण्याच्या किंमतीत वाढ

बँकेत जमा असलेल्या विमाच्या मर्यादेत एक लाखावरुन वाढ करुन ती किंमत आता पाच लाख करण्यात आली आहे. तसेच जमा असलेल्या विमाच्या पैशांवरील गॅरंटीही वाढवण्यात आली आहे.

एलआयसीच्या NPA मध्ये वाढ

आर्थिक वर्ष म्हणजेच 2019-20 च्या सुरुवातीच्या सहा महिन्यात (एप्रिल ते सप्टेंबर) एलआयसीच्या गैर निष्पादित संपत्ती म्हणजे NPA मध्ये 6.10 टक्के वाढ झाली आहे. हा NPA खासगी क्षेत्रातील एस बँक, आयसीआयसीआय, एक्सिस बँकेंच्या NPA जवळ आहे.

NPA मध्ये वाढ झाल्याने खासगी क्षेत्रातील प्रसिद्ध बँकाही अस्वस्थता वाढताना दिसत आहेत. आर्थिक वर्ष 2019-20 च्या दुसऱ्या तिमाहीत एस बँकेचा NPA 7.39 टक्के, आयसीआयसीआयचा 6.37 टक्के आणि एक्सिस बँकेचा एनपीए 5.03 टक्क्यापर्यंत पोहोचला होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.