LPG Gas Cylinder Price: 73.5 रुपयांनी महागला एलपीजी गॅस, पटापट तपासा नवे दर

देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) ने 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 73.5 रुपयांनी वाढ केली.

LPG Gas Cylinder Price: 73.5 रुपयांनी महागला एलपीजी गॅस, पटापट तपासा नवे दर
2. एलपीजी स्वयंपाकाच्या गॅसची किंमत : सप्टेंबर महिन्यात ईएलपीजी स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीतही बदल होईल. भूतकाळातील ट्रेंड पाहता, एलपीजीच्या किमतीत घट होण्याची शक्यता कमी आणि वाढण्याची शक्यता जास्त आहे. जुलै महिन्यापासून प्रत्येक महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. या अर्थाने, असे मानले जाते की, सप्टेंबरमध्ये देखील किमती वाढू शकतात. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस एलपीजीच्या किमतीत 18 ऑगस्टला 25 रुपये प्रति सिलिंडर वाढ करण्यात आली होती, जी सलग दुसऱ्या महिन्यात सरळ वाढ होती. तेल कंपन्यांच्या किमतीच्या अधिसूचनेनुसार, अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत आता दिल्लीमध्ये प्रति 14.2 किलो सिलिंडरसाठी 859 रुपये आहे. भाववाढीचा हा सलग दुसरा महिना आहे. यापूर्वी 1 जुलै रोजी प्रति सिलिंडर 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

नवी दिल्लीः नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी महागाईचा आणखी एक धक्का बसलाय. सरकारी तेल कंपन्यांनी 1 ऑगस्टपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केलीय. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) ने 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 73.5 रुपयांनी वाढ केली. यानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1,500 रुपयांवरून 1623 रुपये प्रति सिलिंडर झाली.

…म्हणून 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या नाहीत

तेल कंपन्यांनी सामान्य माणसाने वापरलेल्या 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या नाहीत. त्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीमध्ये 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 834.50 रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25.50 रुपयांची वाढ केली होती.

अनुदानाशिवाय 14.2 किलो सिलिंडरची किंमत

विनाअनुदानित 14.2 किलो सिलिंडरची किंमत दिल्लीमध्ये 834.50 रुपये, कोलकात्यात 861 रुपये, मुंबईत 834.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 850.50 रुपये प्रति सिलिंडर आहे.

19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची नवी किंमत

सरकारी तेल कंपन्यांनी 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली. सर्वाधिक वाढ चेन्नईमध्ये 73.50 रुपये प्रति सिलिंडर झाली. दिल्लीत 19 किलो व्यावसायिक गॅसची किंमत 73 रुपयांनी वाढून 1623 रुपये झाली. कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 72.50 रुपयांनी वाढून 1629 रुपये, मुंबईत 72.50 रुपयांनी वाढून 1579.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 73.50 रुपयांनी 1761 रुपये प्रति सिलिंडर झाली.

LPG ची किंमत कशी तपासायची?

एलपीजी सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाईटवर जावे लागेल. येथे कंपन्या दर महिन्याला नवीन दर जारी करतात. (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx) या लिंकवर तुम्ही तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता.

ग्राहक इच्छेनुसार वितरक निवडण्यास सक्षम

एलपीजी ग्राहक त्यांचे इच्छित वितरक निवडू शकतात आणि सिलिंडर पुन्हा भरू शकतात. सुरुवातीच्या टप्प्यात ही सुविधा जून 2021 मध्ये चंदीगड, कोईंबतूर, गुडगाव, पुणे आणि रांची येथे सुरू करण्यात आली. ही सुविधा सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून ग्राहकांना वेळेवर आणि घाईत रिफील प्रदान करता येईल.

संबंधित बातम्या

PNB ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; आता एकाच ATM मधून 3 खात्यांचे पैसे काढता येणार

PMKVY Scheme: आतापर्यंत 1.37 कोटी तरुणांची नोंदणी, 37 विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण उपलब्ध

LPG Gas Cylinder Price: Rs 73.5 Expensive LPG Gas, Check New Rate

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI