AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayodhya | रामनगरीत अनेक कंपन्या शरण, धार्मिक पर्यटनानंतर अयोध्येची बिझनेस हब म्हणून ओळख

Ayodhya | 22 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा करतील. हा अविस्मरणीय सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी अयोध्येत मोठ्या संख्येने भाविक भक्त येणार आहेत. त्यामुळे FMCG आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राशी संबंधित बड्या कंपन्या त्यांची आऊटलेट सुरु करत आहेत.

Ayodhya | रामनगरीत अनेक कंपन्या शरण, धार्मिक पर्यटनानंतर अयोध्येची बिझनेस हब म्हणून ओळख
| Updated on: Jan 05, 2024 | 10:58 AM
Share

नवी दिल्ली | 5 जानेवारी 2024 : अयोध्येतील राम मंदिराचे 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धघाटन होत आहे. यावेळी पंतप्रधान मोदी रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा करतील. त्याचा उत्साह देशभरात आतापासूनच आहे. अयोध्येत मोठ्या संख्येने भाविकभक्त येणार आहेत. हा अभूतपूर्व सोहळा याच देहि, याची डोळा पाहण्याचे भाग्य लाभावे यासाठी भक्तांची अलोट गर्दी उसळणार आहे. गर्दीचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक होण्याची शक्यता आहे. याचाच फायदा FMCG आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राशी संबंधित बड्या कंपन्या घेणार आहेत. त्यांनी मंदिराच्या उद्धघाटनापूर्वीच आऊटलेट सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. अयोध्या आता बिझनेस हब होणार आहे.

अयोध्या जगाच्या नकाशावर

अयोध्येत राम मंदिराच्या उद्धघाटनानंतर राम मंदिर देशातील सर्वात मोठे धार्मिक स्थळ म्हणून जगाच्या नकाशावर येणार आहे. देशातील कोट्यवधी जनता श्रीरामाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी करणार आहे. अयोध्या येत्या काळात धार्मिक पर्यटन आणि तिर्थाटनासाठी महत्वाचे केंद्र ठरेल. त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होणार आहे. स्थानिक पातळीवर मोठी उलाढाल होणार आहे. अनेक हातांना यामुळे काम मिळेल. एफएमसीजी कंपन्या आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये मोठे बदल दिसतील. अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट, खाद्यपदार्थांच्या कंपन्या अयोध्येत दाखल होत आहेत.

बिसलेरीपासून ते McD पर्यंत सर्वांनाच घाई

ईटीच्या रिपोर्टनुसार, FMCG आणि हॉस्पिटॅलिटीच्या कंपन्यांनी या ठिकाणी व्यावसाय थाटण्याची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. मिनरल वॉटर कंपनी बिसलेरी इंटरनॅशनल अयोध्येत नवीन प्रकल्प उभारत आहे. कंपनीच्या अंदाजानुसार या वर्षभरातच अयोध्येत बाटलीबंद पाणी, सॉफ्ट ड्रिंक्स, स्नॅक्स, किराणा आणि इतर वस्तूंची मागणी अनेक पटीने वाढणार आहे. बिस्किट आणि एफएमसीजी उत्पादनातील अनेक कंपन्यांनी स्थानिक वितरण व्यवस्था वाढविण्याची कवायत सुरु केली आहे. पारले प्रोडक्ट्सने अयोध्या आणि जवळपासच्या भागातील वितरण प्रणाली वाढवली आहे. मॅकडोनाल्ड आणि बर्गर सिंह या कंपन्या अयोध्या-लखनऊ महामार्गावर नवीन आऊटलेट सुरु करत आहेत.

पर्यटकांची तोबा गर्दी

  • तज्ज्ञांच्या मते, राम मंदिराचे कार्य जसंजसे पूर्णत्वाकडे जात आहे, अयोध्येत भाविक भक्तांसह पर्यटकांची रीघ लागली आहे. परदेशी पर्यटक सुद्धा वाढले आहेत. अयोध्या पर्यटनात 8-10 पट वाढीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. राम मंदिराच्या उद्धघाटनापूर्वीच हॉटेल बुकिंगमध्ये 70-80 तेजी दिसून आली.
  • उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या आकड्यानुसार, वर्ष 2021 मध्ये अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांची संख्या 3.25 लाख होती. 2022 मध्ये हा आकडा 85 पटीने वाढला. अयोध्येत 2.39 कोटी भाविक, पर्यटक आले. आता मंदिर तयार झाल्यावर त्यात 8-10 पट वृद्धी होण्याची शक्यता आहे. एका अंदाजानुसार, अयोध्यात दरवर्षी 20-25 कोटी पर्यटक भेट देतील.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....