‘रुपे’विरोधात ‘मास्टर’गेम, मोदींविरोधात ट्रम्पकडे तक्रार

‘रुपे’विरोधात ‘मास्टर’गेम, मोदींविरोधात ट्रम्पकडे तक्रार

मुंबई : मोदी सरकार ‘रुपे’च्या माध्यमातून राष्ट्रवादाचा प्रसार करत आहेत. त्यामुळे ‘रुपे’चा भारतात प्रसार होत आहे. याचाच फटका परदेशी पेमेंट कंपन्यांना बसताना दिसत आहेत. याचाच प्रत्यय ‘मास्टरकार्ड’ने नुकत्याच केलेल्या एका तक्रारीवरुन दिसून आला. ‘मास्टरकार्ड’ने मोदींविरोधात थेट ट्रम्प सरकारकडे तक्रार केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादाचा दाखला देत रुपेचा प्रचार-प्रसार करत असल्याचा अहवालच मास्टरकार्डने अमेरिकन सरकारकडे सोपवला आहे. हा अहवाल ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेच्या हाती लागला आहे.

रुपेच्या वाढत्या प्रभावामुळे ‘मास्टरकार्ड’ आणि ‘विसा’ या परदेशी कंपन्यांना मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यात रुपेला थेट भारत सरकारनेच प्रमोट करण्यास सुरुवात केल्याने या परदेशी कंपन्यांमध्ये मोठी खळबळ माजल्याचे दिसून येते आहे.

‘रुपे’चा वापर म्हणजे देशभक्ती, असा संबंध मोदींनी जोडल्याने लोक देखील रुपेला पसंती देऊ लागले आहेत. याचा मोठा फटका विसा, मास्टरकार्ड कंपन्यांना होत आहे. नेटवर्क पेमेंट इंडस्ट्रीमध्ये रुपेचा दबदबा वाढल्यामुळे मास्टरकार्ड यांचा दबदबा कमी झाल्याचे चित्र आहे.

भारतात सुमारे एक कोटी डेबिट आणि क्रेडीट कार्डस् वापरकर्त्यांपैकी 50 लाख वापरकर्ते हे रुपे पेमेंट पद्धतीचा वापर आता करु लागलेत. त्यामुळे जगभरात मास्टरकार्ड आपला विस्तार झपाट्याने करत असताना भारतात मात्र त्यांना पाय रोवणे कठीण होऊन बसले आहे.

Published On - 6:06 pm, Fri, 2 November 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI