दसऱ्याला 200 पेक्षा जास्त मर्सिडीजची विक्री, सर्वाधिक ग्राहक मुंबईत

बई, गुजरात आणि इतर ठिकाणी एकाच दिवशी तब्बल 200 पेक्षा जास्त कार विकण्याचा विक्रम करण्यात आल्याचं मर्सिडीज बेंझकडून (Mercedes-Benz India) सांगण्यात आलंय.

दसऱ्याला 200 पेक्षा जास्त मर्सिडीजची विक्री, सर्वाधिक ग्राहक मुंबईत

मुंबई : आर्थिक मंदीमुळे ग्राहकांची कमी झालेली खरेदी क्षमता सण-उत्सवांच्या काळात वाढत असल्याचं दिलासादायक चित्र आहे. कारण, आलिशान कार निर्माता कंपनी मर्सिडीज बेंझने (Mercedes-Benz India) भारतात एकाच दिवसात 200 पेक्षा जास्त कारची विक्री केली आहे. मुंबई, गुजरात आणि इतर ठिकाणी एकाच दिवशी तब्बल 200 पेक्षा जास्त कार विकण्याचा विक्रम करण्यात आल्याचं मर्सिडीज बेंझकडून (Mercedes-Benz India) सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे सणाच्या मुहूर्तावर तब्बल 125 पेक्षा जास्त कार फक्त मुंबईतच खरेदी करण्यात आल्या आहेत. 74 कार गुजरातमध्ये विकण्यात आल्या.

मर्सिडीजसाठी गुजरात आणि मुंबई हे नेहमीच सर्वोच्च विक्रीचं ठिकाण आहे. C-Class आणि E-Class या सेडानकडे ग्राहकांचा जास्त ओढा आहे. याशिवाय जीएलसी आणि जीएलई या एसयूव्हीनेही बाजारात चांगली कामगिरी केली असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, CLA, GLA आणि C-Class ला गुजरातमध्ये जास्त पसंती मिळाली. गुजरात आणि मुंबईतील उद्योगपती, डॉक्टर, सीए (चार्टर्ड अकाऊंटंट) आणि वकील यांचा ग्राहकांमध्ये सर्वाधिक समावेश आहे.

दसरा आणि नवरात्रीमध्ये 2018 चाही विक्रम मोडीत निघाला असल्याचं कंपनीने म्हटलंय. आलिशान कारसाठी मर्सिडीज बेंझचं मोठं जाळं भारतात आहे. मर्सिडीजचे देशात 47 शहरांमध्ये 94 आऊटलेट्स आहेत. कंपनीकडून लवकरच नवीन कार बाजारात येणार असल्याचंही सांगण्यात आलंय.

मर्सिडीज बेंझ भारताचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक म्हमाले, “गुजरात आणि मुंबई हे कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचं मार्केट आहे. दसरा आणि नवरात्रीच्या मुहूर्तावर एकाच दिवसात 200 पेक्षा जास्त कारची विक्री झाली. 2018 मध्ये आमच्याविषयी ग्राहकांमध्ये जे प्रेम होतं, ते आजही कायम आहे. आमच्या यशामागे ग्राहकांचाच हात आहे, त्यामुळे त्यांचे आभार मानतो.”

भारतात मर्सिडीज बेंझची सुरुवात 1994 ला झाली असून हे 25 वं वर्ष आहे. देशात आलिशान कारसाठी महत्त्वाचा ब्रँड म्हणून मर्सिडीजची ओळख आहे. तर जगभरात कंपनी 130 वर्षांपासून ऑटो क्षेत्रात कार्यरत आहे. पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये मर्सिडीजचा 100 एकरात जागतिक पातळीवरील प्लांट आहे, ज्याची सुरुवात 2009 मध्ये झाली.

चाकणमधीलच दुसऱ्या प्लांटमध्येही 2015 पासून कार निर्मिती सुरु करण्यात आली आहे. कंपनीची चाकणमध्ये सध्या 2200 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *