बड्या देशांच्या अर्थव्यवस्था Microsoft पुढे फिक्या, इतके आहे मार्केट कॅप

Microsoft Bill Gates | फोर्ब्सने नुकतीच जगातील टॉप-10 सर्वाधिक बाजार मूल्य असणाऱ्या कंपन्यांची यादी जाहीर केली. त्यातील पहिल्या पाच कंपन्यांपैकी 4 तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत. त्यात मायक्रोसॉफ्ट हीच बॉस आहे. काही देशांच्या अर्थव्यवस्थांपेक्षा कंपनीचे भांडवल अधिक आहे.

बड्या देशांच्या अर्थव्यवस्था Microsoft पुढे फिक्या, इतके आहे मार्केट कॅप
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 4:36 PM

नवी दिल्ली | 20 March 2024 : जेव्हा पण भारतातील मौल्यवान कंपन्यांची गोष्ट निघते. तेव्हा मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे नाव सर्वात आघाडीवर असते. पण जेव्हा जागतिक कंपन्यांची चर्चा होते. तेव्हा मायक्रोसॉफ्टशिवाय कोणीच लवकर डोळ्यासमोर येत नाही. कारण बिल गेट्सची मायक्रोसॉफ्ट कंपनी ही जगातील पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीचे बाजारातील मूल्य इतके आहे की, जगातील काही प्रगत अर्थव्यवस्था पण त्यापुढे फिक्या आहेत. भारताची पूर्ण अर्थव्यवस्था आणि मायक्रोसॉफ्टचे बाजारातील मूल्य जवळपास सारखे असल्याचे सांगण्यात येते.

तंत्रज्ञान कंपन्यांचा बोलबाला

फोर्ब्सने नुकतीच जगातील टॉप-10 सर्वाधिक बाजार मूल्य असलेल्या कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात जगातील टॉप-5 कंपन्यांमधील 4 टेक्नोलॉजी सेक्टरमधील आहेत. पण त्यात एकही भारतीय कंपनी नाही. तर जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांचा त्यात समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

भारतीय अर्थव्यवस्थेइतकी उलाढाल

या यादीनुसार, मायक्रोसॉफ्टचे बाजारीतील भांडवल, मार्केट कॅप 3.1 ट्रिलियन डॉलर इतके आहे. भारतीय अर्थव्यवस्थेशी तुलना करता ते समसमान दिसून येते. भारताची अर्थव्यवस्था सध्या 3.5 ट्रिलियन डॉलर इतकी आहे. ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मायक्रोसॉफ्टचे बाजारातील मूल्य हे जगातील अनेक अर्थव्यवस्थांपेक्षा जास्त आहे.

या आहेत टॉप-10 कंपन्या

कंपन्यांची बाजारातील मूल्यानुसार हिशोब लावल्यास टॉप-10 यादीत, मायक्रोसॉफ्ट पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर Apple कंपनी आहे. तिचे बाजारातील मूल्य 2.68 ट्रिलियन आहे. एनवीडिआ तिसऱ्या क्रमांकवर आहे. तिचे बाजारातील मूल्य 2.21 ट्रिलियन डॉलर आहे. सौदी अरामको 2.01 ट्रिलियन डॉलर, अल्फाबेट (गुगल) 1.84 ट्रिलियन डॉलर, Amazon 1.81 ट्रिलियन डॉलर आणि मेटा प्लेटफॉर्म्स (Facebook) 1.26 ट्रिलियन डॉलर आहे.

फोर्ब्सच्या टॉप-10 कंपन्या

याशिवाय वॉरेन बफे यांची बर्कशायर हॅथवेचे मार्केट कॅप 883.7 अब्ज डॉलर, एली लिलीचे बाजारातील भांडवल 724.6 अब्ज डॉलर, तर सेमीकंडक्टर कंपनी टीएसएमसी 708.75 अब्ज डॉलर इतके भांडवल आहे. कोणत्याही कंपनीचे मार्केट कॅप हे त्या कंपनीच्या शेअर्सची एकूण बाजारातील मूल्य असते. शेअर बाजारातील चढउतारानुसार कंपन्यांचे मार्केट कॅप बदलत असते.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.