AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mulitbagger Share : चारच दिवसात पैसा डबल; या शेअरने बाजारात आणले तुफान, तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?

MP Materials Stock Doubles : दुर्मीळ धातू शोधणाऱ्या कंपनीने जोरदार मुसंडी मारली. गेल्या चार दिवसात या कंपनीने दुप्पट परतावा दिला. बाजार तळ्यातमळ्यात असतानाच या शेअरने गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का दिला.

Mulitbagger Share : चारच दिवसात पैसा डबल; या शेअरने बाजारात आणले तुफान, तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
शेअर मार्केट
| Updated on: Jul 17, 2025 | 10:41 AM
Share

अमेरिकेन अर्थ मटेरियल्स कंपनी, MP Materials Corp ने शेअर बाजारात धमाका केला आहे. कंपनीच्या शेअर्सनी अवघ्या 4 व्यापारी सत्रात 100 टक्के परतावा दिला आहे. मंगळवारी, 15 जुलै 2025 रोजी शेअरमध्ये 20 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्यामुळे या शेअरची किंमत इंट्राडेवर 61.72 डॉलरवर पोहचला. बुधवारी शेअरमध्ये चढउतार दिसला. पण या घडामोडींमुळे शेअर गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला.

MP Materials Corp काय करते?

MP Materials Corp एक मोठी अमेरिकन कंपनी आहे. ही कंपनी रेअर अर्थ मटेरियल्स म्हणजे दुर्मीळ धातू काढते आणि त्यावर प्रक्रिया करते. हा धातू दुर्मीळ आहे. पण सध्याच्या तांत्रिक युगात त्याला मागणी अधिक आहे. इलेक्ट्रिक वाहनं, विंड टर्बाईन, स्मार्टफोन आणि लष्करी वापरासाठीच्या उपकरणात त्याचा सर्वाधिक वापर होतो. अमेरिकेतील माऊंटेन पास या खाणीत हा धातू मिळतो. ही कंपनी जगभरात प्रसिद्ध आहे. MP Materials खासकरून नियोडिमियम आणि प्रासियोडिमियमवर जोर देते. हे धातू चुंबक तयार करण्यासाठी वापरण्यात येते.

शेअरमध्ये कशामुळे तेजी?

हा शेअर का तेजीत आला याची माहिती समोर आलेली नाही. दूर्मिळ धातुचा वापर वाढल्याने त्याची मागणी सातत्याने वाढत आहे. या कारणामुळे हा शेअर तेजीत आल्याचा दावा करण्यात येत आहे. ग्रीन टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिक वाहन, आणि रिन्यूएबल एनर्जी या क्षेत्रात या धातूची मागणी वाढली आहे. नवीन प्रकल्प वा भागधारक कंपन्या सतत वाढत आहेत. या कंपनीमुळे चीनवरील अमेरिकेचे अवलंबित्व कमी झाले आहेत. या शेअरने मोठी भरारी घेतल्याने MP Materials ने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले.

हा शेअर वधारणार का?

काही तज्ज्ञांच्या मते भविष्यात MP Materials Corp च्या शेअर्समध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरीही सध्याची स्थिती पाहता काही तज्ज्ञांनी या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. एकदम भरारी घेणारे शेअर्स अचानक जमिनीवर आपटतात. त्यामुळे जोखीम घेताना कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा शेअर भविष्यात उसळी घेईल की नाही हे पाहण्यासाठी बाजाराची काय स्थिती आहे हे सुद्धा पाहणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.