Mutual Fund Scheme : 50 हजार गुंतवले की मिळणार 15 लाख रुपये, पण नेमकं कसं? गुंतवणुकीचा अफलातून फंडा जाणून घ्या!
दीर्घकालीन गुंतवणुकीचा मार्ग निवडल्यास म्युच्यूअल फंडाच्या माध्यमातून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात.

Mutual Fund Lumpsum Investment : आपल्याकडे असलेल्या पैशांचे मूल्य आणखी वाढावे असे प्रत्येकालाच वाटते. पण अनेकांना हे पैसे नेमके कुठे गुंतवावेत ते समजत नाही. म्युच्यूअल फंड ही हा असा गुंतवणुकीचा मार्ग आहे, जो तुम्हाला कमी जोखमीत जांगला परतावा देऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर तुम्ही 50 हजार रुपये एकरमकी भरल्यास तुम्हाला 15 लाख रुपये कसे मिळू शकतात? ते जाणून घेऊ..
दीर्घकालीन गुंतवणुकीचा मार्ग निवडल्यास म्युच्यूअल फंडाच्या माध्यमातून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. म्युच्यूअल फंडाच्या माध्यमातून अनेक एसआयपी करण्याचा पर्याय निवडतात. या मार्गाचा अवलंब करून जमेल तशी गुंतवणूक केली जाते. मात्र एकरकमी पैसे भरूनही तुम्हाला म्युच्यूअल फंडात चांगले पैसे मिळू शकतात. योग्य ती योजना आणि धीर धरून गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडला तर हे शक्य आहे.
चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळणार
म्युच्यूअल फंडात तुम्ही जेव्हा एकरकमी पैसे गुंतवता तेव्हा तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे भरण्याची गरज उरत नाही. तुम्ही गुंतवलेल्या एकरकमी पैशांचे मूल्य दरवर्षी वाढत राहते. तुम्ही हीच गुंतवणूक दीर्घकाळासाठी ठेवली तर चक्रवाढ व्याजाच्या माध्यमातून मिळणारा परतावाही वाढतो.
50 हजारातून 15 लाख रुपये से मिळतील?
म्युच्यूअल फंडात तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर साधारण 12 टक्क्यांनी परतावा मिळतो, असे गृहित धरले जाते. परताव्याचे हे प्रमाण कमी-अधिक होऊ शकते. तुम्ही म्युच्यूअल फंडात एकरकमी 50 हजार रुपये गुंतवले तर 30 वर्षांनी या पैशांचे मूल्य तब्बल 15 लाख रुपये होऊ शकते. तुम्ही गुंतवलेल्या या 50 हजार रुपयांवर 30 वर्षांत तब्बल 14 लाख 47 हजार 996 रुपये व्याज म्हणून मिळू शकतात.
35 वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यास किती रुपये मिळणार?
तुम्ही 25 वर्षांचे असाल आणि 60 व्या वर्षी निवृत्त होणार असाल तर तुम्ही एकूण 35 वर्षे गुंतवणूक करावी. तुम्हाला मिळालेल्या या वेळेचा योग्य फायदा उचलत तुम्ही काही हजार रुपये गुंतवणू लाखो रुपयांचा परतावा मिळवू शकता. समजा एखाद्या 25 वर्षांच्या व्यक्तीने दीड लाख रुपये एकरकमी भरले तर याच 35 वर्षांत या पैशांचे मूल्य तब्बल 44,93,988 रुपये होईल. म्हणजेच दीड लाख रुपयांवर तब्बल 43,43,988 रुपये व्याज मिळेल. गुंतवणुकीची हीच रक्कम 3 लाख रुपये केली तर परत मिळणारी रक्कम ही 89,87,977 रुपये असू शकते. यात तुम्हाला एकूण 86,87,977 रुपये व्याज म्हणून मिळू शकतात.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)
