AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neha Narkhede : या मराठी लेकीने उंचावली मान! अमेरिकेत उभारली 75,000 कोटींची कंपनी

Neha Narkhede : अनेक महिला स्वतःच्या हिंमतीवर आकाशाला गवसणी घालत आहेत. त्यात आपल्या मायभूमीच्या लेकी पण मागे नाहीत म्हटलं. नेहा नारखेडे या मराठी मुलीने अमेरिकेत नाव काढले आहे. ती मोठी उद्योजिका आहे. असा होता तिचा प्रवास..

Neha Narkhede : या मराठी लेकीने उंचावली मान! अमेरिकेत उभारली 75,000 कोटींची कंपनी
| Updated on: Jul 13, 2023 | 10:41 AM
Share

नवी दिल्ली : अनेक महिला स्वतःच्या हिंमतीवर आकाशाला गवसणी घालत आहेत. त्यात आपल्या मायभूमीच्या लेकी पण मागे नाहीत म्हटलं. नेहा नारखेडे (Neha Narkhede) या मराठी मुलीने अमेरिकेत नाव काढले आहे. नेहाने टेक उद्योजिका म्हणून ओळख निर्माण केली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि व्यावसायिक क्षेत्रातील महिला उद्योजिकांमध्ये तिचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. नेहाची गणना अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रात जगातील यशस्वी महिलांमध्ये होते. ती मुळची पुण्याची आहे. फोर्ब्सने (Forbes) नुकतीच अमेरिकेतील सेल्फ मेड महिलांची (Self Made Ladies) यादी प्रसिद्ध केली. त्यात नेहाचा गौरव करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या लेकीने दूर अमेरिकेत स्वतःच्या हिंमतीवर आपल्या सगळ्यांची मान उंचावली आहे.

इतक्या संपत्तीची मालकीण नेहाची नेटवर्थ 520 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 42 हजार कोटी रुपये आहे. ती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्लाऊड सर्व्हिस देते. सॉफ्टवेअर कंपनी कॉन्फ्लुएंट ची ती सह संस्थापक आहे. कॉन्फ्लुएंट कंपनीचे बाजारातील मूल्य सध्या 9.1 बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 75 हजार कोटी रुपये आहे. या कंपनीत नेहाची हिस्सेदारी 6 टक्के आहे.

नेहा नारखेडे यांची यशोगाथा नेहा नारखेडे मुळची पुण्याची आहे. पुण्यातच तिचे शिक्षण झाले आहे. 2006 मध्ये नेहा पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत आली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नेहा दोन वर्षे ऑरकल या कंपनीत टेक्निकल स्टॉफ म्हणून कार्यरत होती. त्यानंतर ती लिंक्डइन या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून रुजू झाली. तिला लागलीच पदोन्नती मिळाली. तिने मागे वळून पाहिलेच नाही. लिंक्डइनने तिची कामगिरी पाहून तिला स्ट्रीम इंफ्रास्ट्रक्चरचे प्रमुख केले. याच ठिकाणी नेहाने तिच्या टीमसह ओपन सोर्स मॅनेजिंग सिस्टिमचे काफ्का विकसीत केले. त्यामुळे डेटा हँडलिंग सोपे झाले.

नवीन स्वप्नांना उभारी 2014 मध्ये नेहा आणि तिच्या लिंक्डइनमधील दोन सहकाऱ्यांनी नोकरी सोडून दिली. त्यांनी कॉन्फ्लुएंटची सुरुवात केली. कॉन्फ्लुएंट एक क्लाऊड सोल्यूशन देणारी कंपनी आहे. ही कंपनी इतर कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर डेटा प्रोसेससाठी मदत करते. नेहाने पाच वर्षे या कंपनीची चीफ टेक्नोलॉजी आणि प्रोडक्ट ऑफिसर म्हणून काम पाहिले. सध्या ती या कंपनीची बोर्ड मेंबर आहे. नेहाने 2021 मध्ये ऑसिलर नावाची कंपनी सुरु केली. ती या कंपनीची सीईओ आहे.

वडिल प्रेरणास्थान नेहाने सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत, तिचा प्रवास उलगडला. तिने या यशामागे वडिलांची प्रेरणा असल्याचे सांगितले. त्यांनी लहानपणापासूनच प्रेरीत केले. अनेक यशस्वी महिलांची इनसाईड स्टोरी, त्यांची संघर्षगाथा सांगितली. त्यांनी अनेक पुस्तके आणून दिली. इंदिरा गांधी, इंद्रा नूयी, किरण बेदी यांच्यासह अनेक महिलांची यशोगाथा वडिलांमुळे समजल्याचे तिने सांगितले.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.