AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जेवणाच्या वेळेनंतर या’, बँकेतील हे वाक्य आता विसरुन जा, सरकारचा मोठा निर्णय काय

Banking Updates | बँकेत अनेकदा आपण पोहचतो, तेव्हा लंच अवर झालेला असतो. किंवा लंचनंतर या असे सांगून आपल्याला थांबायला सांगितले जाते. पण लवकरच हा शब्द बँकेच्या कामकाजातून हद्दपार होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार यासंबंधीची नवीन नियमावली आणण्याच्या बेतात आहे. त्यामुळे तुमचा पण फायदा होईल.

'जेवणाच्या वेळेनंतर या', बँकेतील हे वाक्य आता विसरुन जा, सरकारचा मोठा निर्णय काय
लंच नंतर या राव, या पालूपदाला बाय बायImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 22, 2024 | 9:52 AM
Share

बँकेत गेल्यावर अनेकदा तुम्हाला लंचनंतर या, नाश्ता सुरु आहे, नंतर या अशी आर्जव, तर कधी कधी दरडावून सांगण्यात येते. हा अनुभव नियमीत जाणाऱ्यांसाठी नवीन नाही. पण लवकरच बँक कामकाजातून हा शब्दच हद्दपार होण्याची शक्यता अधिक आहे. सरकार बँकेतील ग्राहकांचा अनुभव बदलविण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी सरकारने तयारी केली आहे. खासकरुन दिव्यांगांना बँकेत तिष्ठत, ताटकळत बसविण्याच्या क्रुर पद्धतीला आळा घालण्यासाठी केंद्रानं पाऊल टाकलं आहे. त्यासाठी एक मार्गदर्शक सूचनांचा ड्राफ्ट पण शेअर केला आहे. या बदलाचा कदाचित लवकरच परिणाम दिसून येईल.

दिव्यांगाना प्राधान्य

दिव्यांग सबलीकरणासाठी केंद्राने कंबर कसली आहे. त्यांच्यासाठी विविध योजना सुरु करण्यासोबतच सरकारी कार्यालय आणि सार्वजनिक उपक्रमात त्यांना देण्यात येणारी दुय्यम वागणूक बंद करण्यासाठी सरकारने पाऊल टाकले आहे. बँकिंग सेक्टरमध्ये पण त्याचा परिणाम दिसणार आहे. दिव्यांगासह सर्वसामान्य नागरिकांना नाहक तिष्ठत, ताटकाळत ठेवण्याच्या प्रकाराला आळा घालण्यात येणार आहे.

सर्वांसाठी सुलभ, सहज बँकिंग

दिव्यांगासाठी सरकारी आणि सार्वजनिक कार्यालयात रॅम्प बसविण्यापासून तर त्यांच्यासाठी खास प्रणाली सुरु करण्यापर्यंत अनेक उपाय सुचविण्यात आले आहे. स्वयंचलित यंत्र बसविण्याच्या पण सूचना करण्यात आल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी पण या क्षेत्रात अमुलाग्र बदल करण्याचा प्रस्ताव आहे. डिजिटल प्रणालीचा वापर करुन बँकिंग क्षेत्रावरील ताण कमी करण्याचा पण प्रयत्न करण्यात येणार आहे. सुलभ आणि सहज बँकिंगवर येत्या काळात भर देण्यात येणार आहे.

दिव्यांगासाठी स्वतंत्र काऊंटर

बँकेतील काऊंटर आणि रांग व्यवस्थापनासंबंधी पण बदल होतील. दिव्यांगासाठी विशेष काऊंटरचा प्रस्ताव आहे. तर उंचीनुसार पण काऊंटरमध्ये बदल पहायला मिळू शकतो. प्रत्येक ग्राहकांसाठी काऊंटरवर झटपट, सुलभ आणि सहज बँकिंग सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

बँकेत आता स्वयंचलीत यंत्र

बँकेत एटीएम आणि सेल्फ-हेल्फ-मशीच्या वापर वाढविण्यात येणार आहे. त्याद्वारे काऊंटरवरचा भार कमी होईल. तसेच बँकांना त्यांचे संकेतस्थळ आणि डिजिटल कागदपत्रांची सोय करण्यासाठी खास विंडो सुरु करण्याचे, ऑनलाईन बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच दिव्यांग विभागाने याविषयी काही अडचणी असल्यास त्यासंबंधीच्या सूचना, हरकती, अडचणी शेअर करण्यास सांगितले आहे.

पुढील काऊंटरवर जाची बतावणी नको

अनेकदा कामाचा बोजा वाढल्यावर कर्मचारी ग्राहकांना या काऊंटरवरुन त्या काऊंटरवर नाहक हेलपाटे मारायला लावतात. अथवा कामचुकार कर्मचारी मुद्दामहून असे प्रकार सर्रास करत असल्याचा ग्राहकांचा आरोप असतो. त्यावर आता डिजिटल सोल्यशन्स आणि ऑटोमॅटिक मशीनचा वापर वाढविण्याची नामी युक्ती समोर आणण्यात आली आहे. बँकिंगची अर्ध्यांहून अधिक कामे या स्वयंचलित मशीनआधारे करण्याची तजवीज करण्यात येईल.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.