डिजिटल पेमेंटमध्ये दिल्ली मुंबईपेक्षा पुढे आहेत लहान शहरं, 92 टक्के वाढलं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मोठा बदल लहान शहरांमध्ये अधिक प्रमाणात पाहायला मिळाला आहे. इथं व्यावसायिकांपासून ते खरेदीदारांपर्यंत प्रत्येकानेच डिजिटल पेमेंट्स करण्याची पद्धती स्वीकारली आहे.

डिजिटल पेमेंटमध्ये दिल्ली मुंबईपेक्षा पुढे आहेत लहान शहरं, 92 टक्के वाढलं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन

नवी दिल्ली : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गात लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगमुळे 2019 च्या तुलनेत ऑनलाइन व्यवहारामध्ये मोठी वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या या संपूर्ण काळात आतापर्यंत 80 टक्के वाढ झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मोठा बदल लहान शहरांमध्ये अधिक प्रमाणात पाहायला मिळाला आहे. इथं व्यावसायिकांपासून ते खरेदीदारांपर्यंत प्रत्येकानेच डिजिटल पेमेंट्स करण्याची पद्धती स्वीकारली आहे. (online payment digital transaction grow by 92 percent in small cities)

मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या नव्या अहवालात यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. फिनटेक युनिकॉर्न रेजरपे यांनी दिलेल्या वृत्तानुसार, टियर -2 आणि 3 शहरांमध्ये, ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करणाऱ्या लोकांची संख्या 92 टक्क्यांनी वाढली आहे. खरंतर, हा बदल कोरोनामुळे झाला आहे. कोरोनाच्या कठीण काळात संसर्गापासून वाचण्यासाठी सगळ्यांनी आधी बाहेर पडणं थांबवलं. त्यानंतर सोशल डिस्टंसिंगमुळेही ऑनलाईन व्यवहाराला चालना मिळाली आहे. यामुळे लोकांचा वेळही वाचतो.

युटिलिटी पेमेंटमध्ये 357 टक्क्यांनी वाढ

हल्ली लोक कुठलंही बिल भरण्यासाठी कॅश देण्याऐवजी डिजिटल पेमेंट करण्यास जास्त पसंती देता. त्यामुळे युटिलिटी पेमेंट आणि ऑनलाईन बिल पेमेंटमध्ये 357 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या अहवाला दिलेल्या माहितीनुसार, या काळात क्रेडिट / डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि वॉलेट पेमेंटपेक्षा यूपीआयमार्फत जास्त व्यवहार झाले.

यूपीआयमध्ये 120 टक्क्यांनी वाढ

गेल्या वर्षीच्या तुलनेत यूपीआय व्यवहार करण्यास जास्त लोकांची पसंती आहे. यामुळे सुरक्षित आणि व्यवहार लवकर होतो. 2019 च्या तुलनेत या एका वर्षात 120 वाढ झाली आहे. हे विशेषतः टीयर -2 आणि टीयर -3 शहरांमध्ये घडले. (online payment digital transaction grow by 92 percent in small cities)

संबंधित बातम्या – 

कोरोनाचा परिणाम! आरोग्य क्षेत्रासाठी स्वतंत्र फंड देणार सरकार, लवकरच मोठ्या निर्णयाची शक्यता

सरकारची मोठी घोषणा! आयटी भरला नसेल तर आता दंड भरण्यासाठी तयार रहा

(online payment digital transaction grow by 92 percent in small cities)

Published On - 8:19 pm, Tue, 12 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI