Petrol Diesel Rate Today : महागाई होणार चारीमुंड्या चीत! पेट्रोल-डिझेलची येणार स्वस्ताई

Petrol Diesel Rate Today : गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने 14.2 किलोग्रॅम एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांच्या कपातीची घोषणा केली होती. जुलै महिन्यात महागाईने गेल्या 15 महिन्यातील रेकॉर्ड तोडला होता. त्यानंतर किरकोळ महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार उपाय योजना करत आहे.

Petrol Diesel Rate Today : महागाई होणार चारीमुंड्या चीत! पेट्रोल-डिझेलची येणार स्वस्ताई
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 10:10 AM

नवी दिल्ली | 8 सप्टेंबर 2023 : महागाईने जनतेच्या स्वप्नांवर वरवंटा फिरवला. गेल्या जुलैपासून तर महागाईने कळस गाठला आहे. लहरी हवामानामुळे भाजीपाल्यासह डाळी, साखर, गव्हासह तांदळाने जनतेला रडवले आहे. जुलै महिन्यात महागाईने कळस गाठला. महागाईने बेजार केल्याने जनतेचा रोष वाढला होता. त्यामुळे केंद्र सरकारने 14.2 किलोग्रॅम एलपीजी सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमतीत कपातीचे गिफ्ट जनतेला दिले. पण गॅस कंपन्या अजूनही जुना स्टॉक असल्याचे कारण पुढे करत जुन्याच भावाने गॅस सिलेंडरची विक्री करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. केंद्र सरकारने गॅसच्या किंमतीत 200 रुपयांची कपात केली आहे. आता पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Rate Today) कपातीचा निर्णय केंद्र सरकार घेऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून असे अंदाज वर्तविण्यात येत आहे. पण देशात अद्याप पेट्रोल-डिझेलच्या दरात कुठलीच कपात झाली नाही. गेल्या वर्षी मे महिन्यात बदल झाला होता. तेव्हापासून इंधनाचे भाव वाढलेले नाहीत. काही राज्यांनी त्यांवरील करात भर घातली आहे.

इतकी होईल कपात

ब्रोकरेज फर्म जेएम फायनेन्शिअलने हा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 3 ते 5 रुपयांची कपात होऊ शकते. दिवाळीच्या जवळपास इंधन स्वस्ताई येऊ शकते. त्यामुळे महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा मिळू शकतो. तर काही तज्ज्ञांनी जागतिक बाजारातील घडामोडींकडे लक्ष वेधत केंद्र सरकारसाठी असा निर्णय महागात पडू शकतो, अशी शक्यता वर्तवली आहे. सौदी अरब, रशियाने कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्याचा निर्णय मे महिन्यात घेतला होता. पण त्यावर अंमलबजावणी केली नव्हती. आता या देशांनी हा निर्णय या डिसेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलल्याची वार्ता येत आहे.

हे सुद्धा वाचा

कपातीचे कारण काय

देशात वर्षांच्या अखेरच्या टप्प्यात मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाणा आणि मिझोरम या 5 राज्यांमध्ये निवडणुकांचे पडघम वाजतील. निवडणूक आयोगाची तयारी पण झाली आहे. स्थानिक राज्य सरकारांनी पण सवलतींचा पाऊस पाडला आहे. या राज्यात सत्ता पालट होऊ नये यासाठी राज्य सरकार विविध सवलती देत आहे. यापार्श्वभूमीवर देशात पेट्रोल-डिझेलच्या स्वस्ताईच्या चर्चा सुरु आहे.

गेल्यावर्षी शुल्कात झाली होती कपात

गेल्या वर्षी मे महिन्यात पेट्रोल-डिझेलवरील शुल्कात कपात करण्यात आली होती. काही राज्यांनी त्यांच्या मूल्यवर्धित करात कपात केली. त्यामुळे इंधनाचे भाव 10 ते 20 रुपयांनी कमी झाले. केंद्र सरकारने गेल्या वर्षी 22 मे रोजी उत्पादन शुल्क घटविले. काही राज्यांनी पण मूल्यवर्धित करात कपात केली. पण त्यानंतर आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी दरवाढ झाली नाही. गेल्या 11 महिन्यांपासून हा रेकॉर्ड अबाधित आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.