Railway Budget 2024 | ट्रेनच्या डब्ब्यांसंदर्भात निर्मला सीतारमण यांच्या मोठ्या घोषणा

Railway Budget 2024 | ट्रेन्सच्या डब्ब्यांसंदर्भात केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. रेल्वेला 2024 अर्थसंकल्पातून काय मिळणार? याकडे देशवासियांच लक्ष आहे. कारण रेल्वेची भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका आहे. रेल्वे नेटवर्क भारताला जोडतं.

Railway Budget 2024 | ट्रेनच्या डब्ब्यांसंदर्भात निर्मला सीतारमण यांच्या मोठ्या घोषणा
Railway Budget 2024 Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 01, 2024 | 12:41 PM

Railway Budget 2024 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प 2024 सादर केला. यावेळी त्यांनी तीन मोठ्या रेल्वे आर्थिक कॉरिडॉरची घोषणा केली आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये डब्ब्यांचा जो दर्जा आहे, त्या तोडीचे अन्य ट्रेन्सचे डब्बेही बनवण्यात येतील अशी घोषणा सीतारमण यांनी केलीय. आता रेल्वे बजेट स्वतंत्रपणे सादर करण्यात येत नाही. मुख्य अर्थसंकल्पामध्येच रेल्वे बजेटचा समावेश करण्यात आलाय. आर्थिक विकासासाठी भारतीय रेल्वे महत्त्वाची असल्याच निर्मला सीतारमण म्हणाल्या. सुरक्षा, पायाभूत सोयी-सुविधांच्या सुधारणा, नवीन ट्रेन्स लॉन्च आणि रेल्वे स्थानकांचा कायापालट याकडे बजेट 2024 मध्ये लक्ष देण्यात आलय.

आज वंदे भारत ट्रेन आरामदायक सुविधांसाठी ओळखली जाते. या ट्रेन्समध्ये जसे डब्बे आहेत, तसे अन्य ट्रेन्सचे 40 हजार डब्बे बनवण्यात येतील अशी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली. आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या तीन मोठ्या कॉरिडॉरची सुद्धा त्यांनी घोषणा केली.

ऊर्जा, खनिज, सिमेंट कॉरिडॉर

बंदराना जोडणारे कॉरिडोर

हाय ट्रॅफिक कॉरिडोर

वंदे भारत ट्रेन्समध्ये होणार मोठा बदल?

पीएम गती शक्ती उपक्रमातंर्गत या कॉरिडॉरची बांधणी करण्यात येणार आहे. हाय ट्रॅफिक कॉरिडॉरमुळे प्रवासी ट्रेन्सच संचालन अधिक गतीने आणि सुरक्षितपणे होईल. सेमी हाय-स्पीड ट्रेन्सची संख्या आणखी वाढवली जाईल. वंदे भारत ट्रेनमध्ये एअर कंडिशन आहे. पण चेअर कार सर्व्हीसचा विचार करता लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी या ट्रेन्स उपयुक्त नाहीयत. भारतीय रेल्वे आता वंदे भारत स्लीपर ट्रेन्स सुरु करण्याचा विचार करत आहे. राजधानी एक्स्प्रेसपेक्षा या ट्रेन्स जास्त आरामदायक आणि सुविधाजनक असतील.

Non Stop LIVE Update
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.