केंद्रात कोणत्या खात्याला मिळतो सर्वाधिक निधी; काय आहे तुमचा अंदाज तरी?

Union Budget Fund : फेब्रुवारी 2024 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम बजेट सादर केले होते. आर्थिक वर्ष 2024-25 साठी 47.67 लाख कोटींची अर्थसंकल्पात तरतूद केली होती. आता जुलै महिन्यात पूर्ण बजेट सादर होईल.

केंद्रात कोणत्या खात्याला मिळतो सर्वाधिक निधी; काय आहे तुमचा अंदाज तरी?
कोणत्या खात्याला किती निधी?
Follow us
| Updated on: Jun 16, 2024 | 3:59 PM

केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आले आहे. मोदी 3.0 कॅबिनेटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, निर्मला सीतारमण आणि एस. जयशंकर या दिग्गजांची खाती कायम ठेवली आहे. मंत्रिमंडळात काही नवीन चेहऱ्यांना पण संधी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे महत्वाची खाती सोपविण्यात आली आहे. कोणत्या मंत्र्याला अंतरिम बजेटमध्ये किती निधी मिळाला होता, हे तुम्हाला माहिती आहे का?

फेब्रुवारीत अंतरिम बजेट

फेब्रुवारी 2024 मध्ये निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2024-25 साठी 47.67 लाख कोटी रुपयांचे अंतरिम बजेट सादर केले होते. आता एनडीएचे सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आले आहे. जुलै महिन्यात देशाचे पूर्ण बजेट सादर होईल. भाजपचे काही ड्रीम प्रोजेक्ट बाकी आहेत. या केंद्रीय अर्थसंकल्पात ते पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल. पायाभूत सुविधा, संरक्षण आणि इतर क्षेत्रासाठी अनेक मोठ्या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

निर्मला सीतारमण

निर्मला सीतारमण यांच्याकडे अर्थखाते कायम आहे. अंतरिम बजेटमध्ये त्यांच्याकडील अर्थखात्याला 18.5 लाख कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. तो एकूण अर्थसंकल्पाच्या 39 टक्के म्हणजे सर्वाधिक होता. सीतारमण यांच्याकडे कॉर्पोरेट संबंधीचे मंत्रालय आहे. या आर्थिक वर्षासाठी या अर्थसंकल्पातून 667 कोटी रुपये निधी देण्यात आला होता.

राजनाथ सिंह

राजनाथ सिंह दुसऱ्यांदा संरक्षण मंत्री झाले आहेत. संरक्षण मंत्रालयाचे एकूण बजेट 6.2 लाख कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या एकूण अर्थसंकल्पात दुसरा सर्वात मोठा 13, संरक्षण खात्याला देण्यात आला आहे.

शिवराज सिंह चौहान

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील नवीन सदस्य शिवराज सिंह चौहान यांची नवीन इनिंग सुरु होत आहे. त्यांच्याकडे कृषी मंत्रालयासह ग्रामीण विकास मंत्रालय देण्यात आले आहे. कृषी खात्याला 1.3 लाख कोटी तर ग्रामीण विकास खात्याला 1.8 लाख कोटींचा निधी देण्यात आला आहे. चौहान यांच्याकडे एकूण बजेटच्या 6.5 टक्के निधी आहे.

अश्विनी वैष्णव

रेल्वे खाते, माहिती आणि तंत्रज्ञान खात्याचा प्रभार अश्विनी वैष्णव यांच्या खांद्यावर आहे. रेल्वेचे बजेट 2.55 लाख कोटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती मंत्रालयाचे बजेट 21,000 कोटी, तर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे बजेट 4,000 कोटी रुपये आहे. वैष्णव यांच्याकडे एकूण बजेटच्या 5.9 टक्के हिस्सा आहे.

नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय नितीन गडकरी यांच्याकडेच आहे. या मंत्रालयाला 2.78 लाख कोटींचा निधी देण्यात आला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात या मंत्रालयाचा वाटा 5.8 टक्के इतका आहे.

जेपी नड्डा

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे रसायन आणि खत मंत्रालय सोपविण्यात आले आहे. या मंत्रालयाचे बजेट 1.68 लाख कोटी रुपये आहे. तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे बजेट 90,000 कोटीसह त्यांच्याकडे एकूण 2.59 लाख कोटींचा निधी आहे.

प्रह्लाद जोशी

ग्राहक कल्याण, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाची जबाबदारी प्रह्लाद जोशी यांच्या खांद्यावर आहे. त्याचे बजेट 2.13 लाख कोटी तर ऊर्जा मंत्रालयाचे बजेट 12,850 कोटी आहे.

अमित शाह

अमित शाह यांच्याकडे केंद्रीय गृहखात्याची जबाबदारी आहे. या खात्यासाठी 1.4 लाख कोटींचे बजेट, तर सहकार खात्यासाठी 1200 कोटी रुपयांचे बजेट आहे.

Non Stop LIVE Update
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?.
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.