AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रतन टाटांच्या अत्यंत विश्वासू सोबत्याला मुदतवाढ मिळणार नाही ? काय आहे संपूर्ण प्रकरण

सायरस मिस्री यांच्या गच्छंतीनंतर रतन टाटा यांनी टाटा सन्सचे चेअरमन म्हणून आपले राईट हँड असलेल्या एन.चंद्रशेखरन यांना चेअरमन केले होते. आता रतन टाटा यांच्या पश्चात त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.

रतन टाटांच्या अत्यंत विश्वासू सोबत्याला मुदतवाढ मिळणार नाही ? काय आहे संपूर्ण प्रकरण
N. Chandrasekaran
| Updated on: Feb 24, 2026 | 10:31 PM
Share

उद्योजक रतन टाटा आता हयात नाहीत. मात्र त्यांनी त्यांच्या मृत्यू आधी एका खास व्यक्तीकडे टाटा सन्सचे चेअरमन केले होते. त्याचे नाव एन.चंद्रशेखरन असे आहे. साल २०१७ मध्ये बोर्डाने ज्यावेळी चेअरमन सायरस मिस्री यांना हटवले होते, त्यावेळी नेतृत्व कोणाकडे द्यायचे याचे संकट उभे होते. त्याच वेळी चंद्रशेखरन यांना टाटा सन्सचे चेअरमन केले गेले. मात्र, एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी मुदतवाढ देण्याचा निर्णय टाळला आहे. म्हणजेच एन. चंद्रशेखरन यांना मुदतवाढ देण्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

एन. चंद्रशेखरन मूळ टाटा ग्रुपची आयटी कंपनी Tata Consultancy Services (TCS) मधून आले होते. त्यांनी TCS कंपनीला जागतिक स्तरावर मजबूत केले होते आणि टाटा ग्रुपची सर्वात लाभदायक कंपनी बनवले होते. त्यामुळे त्यांची निवड टाटा सन्सच्या चेअरमन पदी रतन टाटा हयात असताना झाली होती. मात्र, आता रतन टाटा यांच्या पश्चात चंद्रशेखरन यांना पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय टाळला असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

वाद काय ?

बोर्डाच्या बैठकीत या मुद्यावर मतभेद झाले आहेत. नोएल टाटा सध्या टाटा ट्रस्टचे चेअरमन आहेत. त्यांनी चंद्रशेखरन यांच्या पुन्हा नियुक्तीस सहमती दिलेली नाही. मात्र, अन्य संचालकांनी चंद्रशेखरन यांना पाठींबा दिला होता. इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार समुहाच्या काही नवीन कंपन्यात वाढलेला तोट्या संदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली. कंपनीच्या बोर्ड मिटींगमध्ये या मुद्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यात काही मतभेद समोर आले. टाटा ट्रस्टचे चेअरमन नोएल टाटा यांनी नव्या वेंचर्समध्ये वाढत्या तोट्याचा मुद्दा उचलला. ग्रीन फिल्ड प्रोजेक्ट्सच्या सुरुवातीच्या टप्प्यात या प्रकाराचा दबाव सामान्य असल्याचे अन्य संचालकांचे म्हणणे होते.

चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ केव्हा संपणार

टाटा सन्सचे चेअरमन असलेले एन. चंद्रशेखरन यांना गेल्या वर्षी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली होती. या मुदतवाढीनुसार चंद्रशेखरन हे ६५ वर्षांचे झाल्यावर सध्याचा त्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२७ रोजी समाप्त होत आहे. चंद्रशेखरन साल २०१७ रोजी टाटा ग्रुपचे नेतृत्व सांभाळले होते. संचालक बोर्डाने जेव्हा माजी चेअरमन सायरस मिस्री यांना पदावरुन हटवले त्यावेळी एन. चंद्रशेखरन यांची निवड या पदावर करण्यात आली होती. या बातमीनंतर Tata Investment Corporation चा शेअर एनएसईवर दुपारी ३:४० वाजता सुमारे २.९४ टक्के घसरुन ६६८ वर ट्रेंड करत होता.

चौकशीला विलंब नको; अजित पवार विमान प्रकरणी आव्हाड आक्रमक
चौकशीला विलंब नको; अजित पवार विमान प्रकरणी आव्हाड आक्रमक.
अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांना नवी शंका, चौकशीबाबत...
अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांना नवी शंका, चौकशीबाबत....
राज्यसभेच्या दोन्ही जागांवर आमचाच हक्क आदित्य ठाकरेंचा दावा
राज्यसभेच्या दोन्ही जागांवर आमचाच हक्क आदित्य ठाकरेंचा दावा.
अंबादास दानवे यांचा 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप
अंबादास दानवे यांचा 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप.
पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोनं शोधण्यासाठी तौबा गर्दी! काय आहे प्रकार
पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोनं शोधण्यासाठी तौबा गर्दी! काय आहे प्रकार.
विरोधी पक्षनेता नसलेले पहिले अधिवेशन! आदित्य ठाकरे यांची टीका
विरोधी पक्षनेता नसलेले पहिले अधिवेशन! आदित्य ठाकरे यांची टीका.
पार्थ पवार, आठवले आणि शेवाळे राज्यसभेवर जाणार? पडद्यामागे काय ठरलं?
पार्थ पवार, आठवले आणि शेवाळे राज्यसभेवर जाणार? पडद्यामागे काय ठरलं?.
सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन
सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन.
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह.
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.