आरबीआयची मोठी घोषणा, बँकासाठी COVID लोन बुक, जाणून घ्या काय आहे योजना?

बँका आपल्या बॅलन्स शीटमध्ये कोविड लोन बुकचा समावेश करतील. | RBI covid loan book

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:58 PM, 5 May 2021
आरबीआयची मोठी घोषणा, बँकासाठी COVID लोन बुक, जाणून घ्या काय आहे योजना?

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गटांगळ्या खात असलेली अर्थव्यवस्था आणि धास्तावलेल्या सामान्य लोकांसाठी रिझर्व्ह बँकेकडून (RBI) बुधवारी काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. यावेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे म्हटले. (RBI Announces covid loan book scheme)

यावेळी RBI ने बँकांसाठी कोविड लोन बुक ही योजना जाहीर केली. या योजनेनुसार बँकांना तीन वर्षांसाठी रेपो रेटच्या दराने पतपुरवठा केला जाईल. याचा अर्थ बँकांना RBIकडून 4 टक्के इतक्या व्याजाने पैसे मिळतील. छोट्या व्यापाऱ्यांना याचा फायदा होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे बँकांना कर्जपुरवठा करणे आणखी सुलभ होईल.

काय आहे कोव्हिड लोन बुक?

बँका आपल्या बॅलन्स शीटमध्ये कोविड लोन बुकचा समावेश करतील. कोविड लोन बुकमध्ये जमा असलेल्या रक्कमेइतके पैसे बँकांना रिझर्व्ह बँकेकडे जमा करावे लागतील. यावर बँकांना रेपो रेटपेक्षा 0.4 टक्के इतके जादा व्याज मिळेल.

‘या’ बँकेकडून बचत खात्यावरील व्याजदरात वाढ, वार्षिक 6 % व्याज मिळणार

कोरोना साथीच्या काळात एअरटेल पेमेंट्स बँकेने ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय. एअरटेल पेमेंट्स बँकेने (Airtel Payments Bank ) आपल्या बचत खात्यावरील ग्राहकांसाठी व्याजदरात वाढ केलीय. आता एअरटेल पेमेंट्स बँकेच्या बचत खात्यात 1 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर वार्षिक 6% व्याज मिळेल. सध्या एअरटेल पेमेंट्स बँकेचे 5.5 कोटींहून अधिक ग्राहक आहेत.

(RBI RBI Announces covid loan book scheme)