Big News : इंग्लंडमध्ये भारताचा डंका! मुकेश अंबानी करणार मोठी डील, या खेळात नशीब आजमावणार

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

Updated on: Nov 13, 2022 | 7:46 PM

Big News : इंग्लंडमध्ये लवकरच भारताचा डंका वाजणार आहे, मुकेश अंबानी अशी खेळी करणार आहेत..

Big News : इंग्लंडमध्ये भारताचा डंका! मुकेश अंबानी करणार मोठी डील, या खेळात नशीब आजमावणार
तर हा क्लब अंबानींच्या मालकीचा
Image Credit source: सोशल मीडिया

नवी दिल्ली : भारतातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी  (Mukesh Ambani) यांच्या एका खेळीमुळे भारताचा इंग्लंडमध्ये (England) डंका वाजणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (RIL) संचालक आणि आयपीएल टीम मुंबई इंडियन्सचे मालक (Mumbai Indians) आता या खेळात ही नशीब आजमवणार आहेत.

तर अंबानी हे आता इंग्लंडमध्ये मोठी डील करण्याच्या तयारीत आहे. ही डील जगातील स्टार फुटबॉल क्लब लिव्हरपूल (Liverpool) सोबत होणार आहे. त्यामुळे क्रिकेटनंतर रिलायन्स समूह आता फुटबॉलमध्येही मजबूत दावेदारी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Mirror.com यांच्या वृत्तानुसार, जगातील सर्वात गाजलेला फुटबॉल क्लब लिव्हरपूल चा हा सौदा लवकरच पूर्ण होईल. या क्लबची मालकी लवकरच नवीन मालकाकडे जाऊ शकते. मुकेश अंबानी यांनी यासंबंधीची चाचपणी केली आहे.

मुकेश अंबानी यांची या क्लबमध्ये खास रुची आहे. त्यांच्या मनात या संघाविषयी हळवा कोपरा आहे. एका दशकापूर्वी ही त्यांनी या क्लबमध्ये पार्टनरशिपची तयारी केली होती. पण आता ते हा क्लबच खरेदी करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

मिररनुसार, या फुटबॉल क्लबसाठी सध्याचे मालक फेनवे स्पोर्ट्स ग्रुप (FSG) यांनी मोठी किंमत लावली आहे. त्यांना हा फुटबॉल क्लब विकायचा आहे. त्यासाठी त्यांनी 4 अरब पाऊंड म्हणजे जवळपास 381 अरब रुपये किंमत लावली आहे.

हे सुद्धा वाचा

अर्थात अंबानी एकटेच या क्लबसाठी इच्छूक आहेत, असे नाही. या स्पर्धेत अनेक प्रतिस्पर्धी आहेत. अमेरिका आणि मध्य युरोपमधील अनेक समूह या क्लबसाठी इच्छूक आहेत. पण अंबानी यांनी बाजी मारल्यास ही मोठी घटना ठरणार आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI