AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीचा सर्वसामान्यांना फटका, जाणून घ्या याचे अर्थव्यवस्थेवरही काय होताहेत परिणाम?

तेल उत्पादक देशांना कमाईची चांगली संधी होती. मागील वर्षी देखील पुन्हा भरपाई करणे गरजेचे होते, पुरवठा कमी झाल्याने संपूर्ण जगात तेलाची मागणी वाढली. (Rising petrol and diesel prices hit the common man, know what are the effects on the economy)

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीचा सर्वसामान्यांना फटका, जाणून घ्या याचे अर्थव्यवस्थेवरही काय होताहेत परिणाम?
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Jun 05, 2023 | 6:33 PM
Share

नवी दिल्ली : मागील वर्षी कोरोनाने तर यंदा पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईने लोकांना त्रस्त झाले आहेत. देशाच्या काही भागात तेलाची किंमत 90 रुपयांच्या वर पोहोचली आणि लोक कमी खर्चाचे इतर पर्याय शोधू लागले. सर्वसामान्यांचा असा विश्वास आहे की यातून सरकारची तिजोरी भरते आणि सामान्य लोकांना भुर्दंड भरावा लागतो. हे काही प्रमाणात न्याय्य आहे कारण कर्जाचा बोजा सर्वसामान्यांवर वाढतो, मग तो आणखी कुठेतरी काटकसर करुन दुसरीकडे पुरवतो. यामुळे त्याची आर्थिक स्थिती दयनीय बनते. दुसरीकडे, सरकार पेट्रोल आणि डिझेलमधून पैसे कमवू शकते, परंतु त्याचा फक्त फायदा होतो की अन्यत्र नुकसान होते? महागाईचा सरकारवरही परिणाम होतो, कारण अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होतो. (Rising petrol and diesel prices hit the common man, know what are the effects on the economy)

तेलाच्या किंमती वाढण्याचे कारण

गेल्या वर्षी तेलाच्या किंमती कमी झाल्या कारण कोरोनाच्या भीतीने लोक घरातच राहिले. गाडीचा वापर कमी झाला. त्यामुळे वातावरणही स्वच्छ व कमी प्रदूषित राहिले. लॉकडाऊनमुळे जगभरात तेलाची मागणी कमी झाली आणि तेल उत्पादक देशांनी त्यांच्या विहिरींवर बंद ठेवल्या. यावर्षी उलट झाले. लॉकडाऊन काढताच लोक वाहने घेऊन बाहेर पडले आणि रस्त्यावर पुन्हा वाहनांची गर्दी करु लागले.

तेल उत्पादक देशांना कमाईची चांगली संधी

तेल उत्पादक देशांना कमाईची चांगली संधी होती. मागील वर्षी देखील पुन्हा भरपाई करणे गरजेचे होते, पुरवठा कमी झाल्याने संपूर्ण जगात तेलाची मागणी वाढली. तेलांच्या किंमती ब-याच प्रमाणात वाढल्या. भारतातही असेच घडले. भारताने तेल उत्पादक देशांना पुरवठा वाढवण्यास सांगितले, पण ओपेक यांनी स्पष्टपणे सांगितले की स्वस्त दरात खरेदी करुन साठा केलेले इंधन आता वापरावे. तेलाचा पुरवठा वाढला नाही आणि भारताचा सर्वात जवळचा मित्र सौदी अरेबिया रातोरात शत्रू बनला.

सौदी अरेबियाकडून तेलाची मागणी भारताने इराण आणि अमेरिकेत हलवली. भारत आपल्या खपातील सुमारे 70 टक्के हिस्सा आयात करतो आणि जगातील आयातीच्या बाबतीत तिसरा मोठा देश आहे. आजच्या तारखेला इराण आणि अमेरिकेपेक्षा भारतात तेल जास्त येत आहे. तेलाची किंमती कधी खाली येतील, इराणी तेलाचा परिणाम कधी दर्शवेल, याबद्दल काहीही सांगणे घाईचे ठरेल.

अर्थव्यवस्थेवर परिणाम

भारत अरब किंवा इराण, अमेरिकेतून तेल मागवले तरी त्याचा फारसा फरक पडत नाही. किंमत किंचित कमी होऊ शकते, परंतु या महागाईमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतच राहील. तेलाच्या आयातीमुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावरील अतिरिक्त ओझे पडेल. एका आकडेवारीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति बॅरल तेलाची किंमत दहा डॉलरने वाढल्यामुळे भारत सरकारला 12.5 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. हे नुकसान आपल्या सामान्य जीवनावर परिणाम करते. कर महाग होतो, खाण्या-पिण्यावर महागाई वाढते, रुपयाचे मूल्य कमी होते.

महागाई आणि जीवन

तोट्यात चाललेली अर्थव्यवस्थेचा परिणाम एलपीजी आणि केरोसीन तेलाच्या किंमतींमध्ये वाढ स्वरुपात पहायला मिळते. काही वर्षांपूर्वी घरात वापरात येणारा एलपीजी सिलेंडर सुमारे 400 रुपये होता, जो आज 800 रुपयांवर पोहोचला आहे. केरोसीनचे दरही जवळपास दुप्पट आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्येही अशीच आग लागली आहे. ही सर्व महागाई सर्वसामान्यांना कुठे नी कुठे कर स्वरुपात भरावी लागेल. केंद्र सरकार आणि राज्य सरकारची यातून मोठी कमाई आहे, म्हणून कोणीही किंमत कमी करु इच्छित नाही. जीएसटीमध्ये आणण्यास कुणीही तयार नाही कारण जीएसटी परिषदेत सर्व राज्यांचा समावेश आहे. सर्व राज्यांच्या संमतीने पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणता येतील. (Rising petrol and diesel prices hit the common man, know what are the effects on the economy)

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.