Surabh Agrawal : कोण आहेत सौरभ अग्रवाल, 14 लाख कोटींच्या कंपनीची सूत्रे यांच्या हातात

Saurabh Agrawal : देशातील अनेक मोठ्या, नामी कंपन्यांचे दिग्गज अधिकारी आपल्या गावी नसतात. पण त्यांची कहाणी वाचली, त्यांच्या संघर्षातून आपल्याला पण पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. हिम्मत मिळते.

Surabh Agrawal : कोण आहेत सौरभ अग्रवाल, 14 लाख कोटींच्या कंपनीची सूत्रे यांच्या हातात
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 6:31 PM

नवी दिल्ली : टाटा सन्स ही देशातील अग्रेसर कंपनी आहे. या कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी सौरभ अग्रवाल (Tata sons CFO Saurabh Agrawal ) हे आहेत. टाटा समूहाचे चेअरमन एन. रामचंद्रन (N Ramachandran) हे प्रमुख अधिकारी आहेत. अग्रवाल यांची भारतीय कॉर्पोरेट जगतात एक ख्याती आहेत. ते हातात घेतलेले काम धसास नेतात. ते काम तडीस नेल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. ते डीलमेकर म्हणून ओळखले जातात. व्होडाफोन आयडिया यांच्यातील विलिनीकरणाचा करार त्यांनीच घडवून आणला. तसेच बाजारातील परिस्थितीचा अगोदरच अंदाज काढण्यातही त्यांचा हातखंड मानण्यात येतो. टाटा सन्सने त्यांच्या नेतृत्वात अनेक योजना राबविल्या आहेत. ते कर्मचाऱ्यांमध्ये पण लोकप्रिय आहेत.

सौरभ अग्रवाल यांनी आयआयटी रुडकी आणि आयआयएम कोलकत्ता येथून पदवी मिळवली आहे. त्यांनी टाटा समूहापूर्वी आदित्य बिर्ला समूह, स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि डीएसपी मेरिल लिंच या कंपन्यांमध्ये पण सेवा बजावली आहे. टाटा सन्समध्ये आदित्य बिर्ला कंपनीत सेवा बजावल्यानंतर ते दाखल झाले. एन. चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सच्या चेअरमनचा कार्यभार सांभाळल्यानंतर अग्रवाल यांची एंट्री झाली.

अग्रवाल यांच्याकडे बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. दोन दशकांचा त्यांचा अनुभव आहे. ते आदित्य बिर्लामध्ये कॉर्पोरेट स्ट्रेटर्जीचे प्रमुख होते. आदित्य बिर्ला नुवोको लिमिटेड आणि ग्रासिम लिमिटेड या कंपन्यांना नवीन ओळख देण्यात अग्रवाल यांचा मोठा हात होता. टाटा कन्सलटन्सीचा 2014 मध्ये आयपीओ दाखल झाला, तेव्हा ते या आयपीओचे सल्लागार होते.

हे सुद्धा वाचा

सौरभ अग्रवाल यांनी आयआयटी रुडकी येथून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी कोलकत्ता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथून एमबीएची पदवी मिळवली. सौरभ अग्रवाल यांनी कॅपिटल मार्केटमध्ये अमिट छाप सोडली आहे. त्यांच्या या सर्व कामगिरीची दखल टाटा सन्सने घेतली आणि त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली.

अग्रवाल यांनी देशातील सर्वात मोठे विलिनीकरण घडवून आणले. आदित्य बिर्ला समूहात असताना त्यांनी आयडिया आणि व्होडाफोन या दोन कंपन्यांचे विलिनीकरण केले. ही प्रक्रिया 28 अब्ज डॉलरची ठरली. याशिवाय जेपी सिमेंटचे अल्ट्राटेककडून अधिग्रहण करण्यात त्यानी मुख्य भूमिका निभावली. देशातील बँकिंग क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केले आहे. त्यांचे योगदानही महत्वपूर्ण आहे. ते स्टँडर्ड चार्टड बँक आणि दक्षिम आशिया, या संस्थेचे प्रमुख आर्थिक अधिकारी म्हणून कार्यरत होते. डीएसपी मेरिल लिंच या आघाडीच्या बँकिंगचे प्रमुख होते.

सौरभ अग्रवाल यांना टाटा सन्सच्या सीएफओ पदावरुन नियुक्त करण्यात आले. त्यांना टाटा सन्सने वर्ष 2022 मध्ये वार्षिक 26 कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते. यासह त्यांना विविध सोयी-सुविधा आणि सवलती पण देण्यात आल्या होत्या. हे सर्व पाहता त्यांना महिन्याला सव्वा दोन कोटी रुपये पगार मिळतो. जर त्यांनी मनावर घेतले, तर ते दर महिन्याला एक मर्सिडीज कार आणि आलिशान बंगला विकत घेऊ शकतात. 2021 मध्ये त्यांना 21.45 कोटी रुपये मिळाले होते. त्यांच्या वेतनात पुन्हा एकदा वाढ झाल्याची चर्चा आहे.

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.