AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alert | ATM कार्ड वापरताय ?, मग SBI ने सांगितलेल्या ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने एटीएम कार्ड वापरण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. या टिप्स सविस्तरपणे जाणून घेऊयात. (SBI ATM card use)

Alert | ATM कार्ड वापरताय ?, मग SBI ने सांगितलेल्या 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा
एटीएम कार्ड हरवलंय? मग त्वरीत करा हे काम
| Edited By: | Updated on: Jan 16, 2021 | 3:52 PM
Share

मुंबई : एटीएम (ATM) कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. मात्र, दुसरीकडे एटीएम कार्डवर व्यवहार करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे गैरव्यावहार किंवा ग्राहकांना लुबाडण्याच्या प्रकारातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने एटीएम कार्ड वापरण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. या टिप्स सविस्तरपणे जाणून घेऊयात. (SBI given tips for best use of ATM card people should follow)

1) एटीएम कार्ड POS मशीनमध्ये टाकण्यापूर्वी किपॅड हाताने झाकून घ्या. त्यामुळे तुमचा पिन कुणीही पाहू शकणार नाही.

2) तुमचा एटीएम कार्ड किंवा पीन कुणालाही सांगू नका. अन्यथा तुमचे एटीएम कार्ड वापरून तुम्हाला लुबाडले जाऊ शकते.

3) एटीएम कार्डवर कधीही पीन लिहून ठेवू नका. कारण एटीएम कार्ड हरवल्यास तुम्ही लिहून ठेवलेल्या पीनच्या साहाय्याने तुमच्या बँक खात्यातून कुणीही पैसे काढू शकतो.

4) ई- मेल, मॅसेज किवा फोन कॉलच्या माध्यमातून तुम्हाला कुणी पीन विचारत असेल तर तो शेअर करु नये. चोर किंवा फसवणूक करणारे तुम्हाला लुबाडण्यासाटी रोज नवनवीने युक्त्या वापरतात. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

5) तुमची जन्मतारीख ही तुमच्या एटीएम कार्डचा पीन म्हणून वापरू नका. कारण सोशल मीडियामुळे तुमची जन्मतारीख शोधणे सोपे आहे. त्यामुळे तुमची फसवणूक सहज होऊ शकते.

6) बँकेच्या कोणत्याही व्यवहाराची पावती एक तर तुमच्या स्व:तजवळ ठेवा किंवा तिला फाडून तिची विल्हेवाट लावा. कारण बँकेच्या पावतीवर तुमच्या खात्यासंबंधी माहिती दिलेली असते. त्यामुळे पावतीच्या मदतीने तुम्हाला फसवले जाऊ शकते.

7) एटीएम मधून पैसे काढण्याअगोदर तिथे एखादा गुप्त कॅमेरा तर नाही ना, याची खबरदारी घ्या. या कॅमेऱ्यांच्या मदतीने तुमच्या एटीएमचा पीन रेकॉर्ड केला जाऊ शकतो.

8) एटीएमचा उपयोग करण्याअगोदर कीपॅड आणि कार्डच्या स्लॉटला व्यवस्थित पाहून घ्या. अनेक वेळा कीपॅड आणि कार्ड स्लॉटमध्ये यंत्राद्वारे तुमच्या एटीएमची माहिती जमा केली जाते. त्यामुळे फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्यावी.

9) तुमच्या मोबाईलवर मेसेजिंग, मेल तसेच इतर अलर्टची सुविधा सुरु असावी. कारण तुमच्या बँकेतून काही व्यवहार झाले तर, तुम्हाल लगेच समजेल.

या गोष्टींची काळजी घेतल्यानंतर एटीएम कार्डच्या माध्यमातून होणारी संभाव्य फसवणूक रोखली जाऊ शकते. त्यामुळे एसबीआयने सांगितलेल्या या टिप्सचा नेहमी उपयोग करा आणि फसवणूक होण्यापासून स्व:तला वाचवा.

संबंधित बातम्या :

शेअर बाजारात मोठी तेजी, गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्सने ओलांडला ऐतिहासिक टप्पा

LIC policy | रोज फक्त 125 रुपये भरा, मिळवा 27 लाख रुपये, सोबतच ‘हे’ मोठे फायदे

SBI अलर्ट | Instant Loan App पासून सावधान, पैशांची गरज असल्यास ‘हे’ करा

(SBI given tips for best use of ATM card people should follow)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.