शेअर बाजारात मोठी तेजी, गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्सने ओलांडला ऐतिहासिक टप्पा

या तेजीत आयटी कंपन्यांच्या समभागांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळे सेन्सेक्स 49, 260.21 चा ऐतिहासिक स्तर गाठला. | Share market Sensex

शेअर बाजारात मोठी तेजी, गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्सने ओलांडला ऐतिहासिक टप्पा
भांडवली बाजार

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक कल आणि परकीय गुंतवणुकदारांच्या उत्साहामुळे भारतीय शेअर बाजारात (Share market) मोठी उसळी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सने (Sensex) 49 हजाराचा विक्रमी टप्पा ओलांडला. भांडवली बाजाराच्या आजवरच्या इतिहासात सेन्सेक्सने पहिल्यांदाच ही पातळी गाठली आहे. (Sensex holds 49k up 300 points Nifty above 14400 IT cos surge)

आज भांडवली बाजार उघडल्यानंतर सेन्सक्सने सुरुवातीच्या सत्रात 400 अंकांची उसळी घेतली. या तेजीत आयटी कंपन्यांच्या समभागांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळे सेन्सेक्स 49, 260.21 चा ऐतिहासिक स्तर गाठला. तर निफ्टीमध्येही 112.45 अंकांची उसळी पाहायला मिळाली. त्यामुळे निफ्टी 14,459.70 च्या स्तरावर पोहोचला.

आयटी कंपन्यांची चांदी

भांडवली बाजारातील या तेजीत इन्फोसिस, एचसीएल टेक, आईटीसी, एचडीएफसी बँक, भारतीय एअरटेल, एचयूएल आणि टीसीएस या कंपन्यांच्या समभागांचा भाव वधारला. तर दुसरीकडे एक्सिस बँक, मारुती, ओएनजीसी, बजाज फायनान्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांचे भाव खाली पडले.

टीसीएसची रिलायन्सच्या तोडीस तोड कामगिरी

भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सलटन्सीने (TCS) एकूण भांडवली मूल्य 12 लाख कोटींवर पोहोचले आहे. इन्फोन्सिच्या समभागाची किंमत तब्बल दोन टक्क्यांनी वाढत 3175 इतकी झाली. या कामगिरीमुळे TCS कंपनी भांडवली मूल्याच्याबाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जवळ येऊन ठेपली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे भांडवली बाजारातील एकूण मूल्य 12 लाख 17 हजार कोटी रुपये इतके आहे. सध्या रिलायन्सच्या एका समभागाची किंमत 1900 रुपये इतकी आहे.

संबंधित बातम्या:

सोनं स्वतात खरेदी करा! RBI कडून डिजिटल पेमेंटवर खास ऑफर

SBI अलर्ट | Instant Loan App पासून सावधान, पैशांची गरज असल्यास ‘हे’ करा

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्कने प्रतितास 127 कोटी रुपये कमावले, जाणून घ्या कसे?

(Sensex holds 49k up 300 points Nifty above 14400 IT cos surge)

Published On - 12:20 pm, Mon, 11 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI