AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Assembly Election Results 2026 : राजकीय कलांचा थेट परिणाम! शेअर बाजाराची जोरदार उडी, एकाच झटक्यात…

पाच राज्यांमधील विधानसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजार जोरदार तेजीसह उघडला. बाजाराचे प्रमुख निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सकारात्मक वाढ दिसून आली. पाचही राज्यांमधील निवडणुकीचे कल जसजसे समोर येऊ लागतील, तसतसे बाजाराच्या समीकरणात हालचालीला वेग येऊ शकतो.

Assembly Election Results 2026 : राजकीय कलांचा थेट परिणाम! शेअर बाजाराची जोरदार उडी, एकाच झटक्यात...
शेअर मार्केटमध्ये तेजी
| Updated on: May 04, 2026 | 10:23 AM
Share

Share Market 4 May : भारतीय शेअर बाजारासाठी आजच्या दिवसाची आणि या आठवड्याची सुरूवात एकदम शानदार झाली आहे. 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर, आज, 4 मे 2026 रोजी शेअर बाजारात प्रचंड तेजी दिसून आली. सुरुवातीच्या कलांनुसार, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरीमध्ये भारतीय जनता पक्षाने आपली पकड मजबूत केसल्याचे दिसून आले, ज्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच व्यापार दिवशी सेन्सेक्स तेजीने उघडला. बाजाराच्या सुरुवातीला, सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला आणि 77, 440 चा इंट्राडे उच्चांक ओलांडला. निफ्टी 50 मध्येही जोरदार तेजी दिसून आली. मात्र, अर्ध्या तासाच्या आतच सेन्सेक्समध्ये पुन्हा तेजी आली आणि सकाळी सुमारे 9.40 पर्यंत सेन्सेक्सने 900 अंकांचा टप्पा ओलांडला होता.

बाकी इंडेक्सचा हाल

शेअर बाजारासाठी या आठवड्याची सुरुवात दमदार झाली. BSE Sensex हा उघडताच 587.50 (0.76%)) वाढून उघडताच 77,501 च्या जवळपास पोहोचला. तर दुसरीकडे निफ्टी हा देखील 192.95 अंकांनी (0.80%) वाढून 24,190 वर पोहोचला. आज बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातही चांगली खरेदी दिसून आली. Nifty Bank 325 अंकांनी वाढून 55,188 वर पोहोचला, तर Nifty Financial Services देखील 150 अंकांनी वाढून 25,807 वर पोहोचला. सेक्टरवाईज पाहिलं तर, ऑटो क्षेत्रातील शेअर्स 2% पेक्षा जास्त वाढले, तर FMCG क्षेत्रातही 1% पेक्षा जास्त वाढ झाल्याचे दिसून आलं.

आज, बाजारात तेजीचा स्पष्टपणे कल दिसून आला. एकूण 903 शेअर्सचा व्यापार सुरू झाला, त्यापैकी 742 शेअर्समध्ये वाढ झाली आणि केवळ 107 शेअर्समध्ये घट झाली. तर 54 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. शिवाय, 69 शेअर्सनी त्यांच्या 52 -आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर केवळ 7 शेअर्सनी नीचांक गाठला. इतकेच नव्हे, तर 36 शेअर्स अप्पर सर्किटमध्ये आणि 13 शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले होते, ज्यामुळे बाजारातील मजबूत तेजीचा कल दिसून आला.

Follow Us
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक.
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख...
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख....