Share Market | Budget पूर्वीच शेअर बाजाराला हादरे; Paytm ची अवस्था तर विचारुच नका

Share Market | बजेट सादर करण्यासाठी आता अवघा काही वेळ उरला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अर्थमंत्रालयात दाखल झाल्या आहेत. पण शेअर बाजाराने या अर्थसंकल्पावर अगोदरच त्याची नकारात्मक प्रतिक्रिया उमटवली आहे. बाजार सुरुवातीलाच आपटला आहे. बजेट सादर झाल्यानंतर कदाचित काही बदल दिसू शकतो.

Share Market | Budget पूर्वीच शेअर बाजाराला हादरे; Paytm ची अवस्था तर विचारुच नका
Follow us
| Updated on: Feb 01, 2024 | 10:47 AM

नवी दिल्ली | 1 February 2024 : थोड्याच वेळात केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. पण शेअर बाजाराने तात्काळ प्रतिक्रिया दिली आहे. बजेटपूर्वीच शेअर बाजार सुरुवातीलाच ढेपाळला. गुंतवणूकदारांना बाजाराच्या या प्रतिक्रियाने सावध केले. जागतिक दबावामुळे शेअर बाजाराची अडखळत सुरुवात झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीची सुरुवात स्थिर होती. पेटीएमवर बुधवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेल्या कडक कारवाईचा थेट परिणाम आज बाजारात दिसून आला. पेटीएमचा शेअर उघडताच दणकावून आपटला.

कशी झाली सुरुवात

सेन्सेक्सने व्यापारी सत्राच्या सुरुवातीलाच केवळ 25 अंकांची झेप घेतली. निफ्टीची सुरुवात पण काहीशी अशीच राहिली. पण काही मिनिटांतच बाजाराने डोळे वटारले. बाजार लाल रंगात न्हाऊन निघाला. सुरुवातीच्या सत्रात चढउतार दिसून आला. सकाळी 9 वाजून 20 मिनटांनी सेन्सेक्स 10 अंकांनी वधारुन 71,750 अंकांवर पोहचला होता. तर निफ्टी 21,730 अंकांवर स्थिरावला होता.

हे सुद्धा वाचा

प्री-ओपन मध्ये मजबूत

बाजार सुरु होण्यापूर्वी निफ्टीत तेजीचे सत्र दिसून आले. ग्रीन झोनमध्ये निफ्टी 21,800 अंकावर व्यापार करत होता. त्यामुळे बाजार कमाल दाखवेल असे वाटत होते. प्री ओपन सेशनमध्ये सेन्सेक्स 315 अंकांहून अधिक वधारला आणि 72 अंकांच्या पुढे सरकला. निफ्टी 50 ने पण पूर्व सत्रात चांगली सुरुवात करत 21,780 अंकाची मजल मारली.

एक दिवसापूर्वी काय स्थिती

बजेटच्या एक दिवसापूर्वी बुधवारी बाजाराने दमखम दाखवला. बाजाराने रिकव्हरी केली. बुधवारी बाजार बंद झाला तेव्हा बीएसई सेंसेक्स 612.21 अंक (0.86 टक्के) तेजीसह 71,752.11 अंकांवर बंद झाला. तर एनएसई निफ्टी 50 काल 203.60 अंकासह (0.95 टक्के) 21,725.70 अंकावर होता.

परदेशी बाजारावर दबाव

परदेशातील बाजारावर सध्या दबाव आहे. अमेरिकन सेंट्रल बँक, फेडरल रिझर्व्हने व्याज दर स्थिर ठेवण्याची घोषणा केली. त्यानंतर जागतिक बाजाराने त्याला प्रतिक्रिया दिली. या निर्णयाचे जागतिक बाजाराने स्वागत केले नाही. अमेरिकेतील शेअर बाजारात पडझड दिसून आली. डाऊ जोन्स, नास्डॅक आणि एसअँडपीने निर्णयाचे स्वागत केले नाही. आशिया बाजारावर दबाव दिसून आला. जपानमधील निक्की, दक्षिण कोरियातील कोस्पी आणि हाँगकाँगमधील हँगसँग बाजारात घसरण दिसली.

बजेटपूर्वी बाजाराचा इतिहास काय

अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजाराच्या इतिहासावर नजर टाकली असता, त्यात अनेकदा मोठे चढउतार दिसून आले. 2021 मध्ये बजेटच्या दिवशी बाजाराने 5 टक्क्यांची उसळी घेतली होती. तर 2015 मध्ये 0.48 टक्के, 2017 मध्ये 1.76 टक्के, 2019 मध्ये 0.59 टक्के आणि 2022 मध्ये 1.46 टक्के तेजीचे सत्र दिसून आले. गेल्यावर्षी बजेटच्या दिवशी बाजार 0.27 टक्के घसरला होता. तर 2016 मध्ये 0.18 टक्के, 2018 मध्ये 0.16 टक्के, 2019 मध्ये 0.99 टक्के आणि 2020 मध्ये 2.43 टक्क्यांची घसरण दिसून आली.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.