AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैद्यकीय क्षेत्रात अपोलो ब्रॅण्डसोबत व्यवसाय सुरू करा; कंपनी करणार मार्केटिंग, तुमची होईल कमाई

कंपनीचा हा व्यवसाय फ्रँचायझी मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. अपोलो डायग्नोस्टिक्सच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, आपल्या देशात मेडिकल डायग्नॉस्टिकचा बाजार 15% सीएजीआर दराने विकास करीत आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रात अनेक संधी आहेत.

वैद्यकीय क्षेत्रात अपोलो ब्रॅण्डसोबत व्यवसाय सुरू करा; कंपनी करणार मार्केटिंग, तुमची होईल कमाई
वैद्यकीय क्षेत्रात अपोलो ब्रॅण्डसोबत व्यवसाय सुरू करा; कंपनी करणार मार्केटिंग, तुमची होईल कमाई
| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 4:01 PM
Share

नवी दिल्ली : वैद्यकीय हे असे एक क्षेत्र आहे, जेथे मंदीचा परिणाम कधीही दिसून येत नाही. अपोलो हा वैद्यकीय क्षेत्रातील एक प्रचंड मोठा ब्रॅण्ड आहे. या ब्रॅण्डसोबत लोकांचा विश्वास जोडला गेला आहे. अपोलो ग्रुपसोबत नाते जोडण्याची संधी तुम्हाला मिळत आहे. या ग्रुपनेच ही संधी उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही अत्यल्प गुंतवणूक करुन अपोलो डायग्नोस्टिक्स सेंटर उघडू शकता. कंपनीचा हा व्यवसाय फ्रँचायझी मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. अपोलो डायग्नोस्टिक्सच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, आपल्या देशात मेडिकल डायग्नॉस्टिकचा बाजार 15% सीएजीआर दराने विकास करीत आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रात अनेक संधी आहेत. (Start a business with the Apollo brand in the medical field; The company will do the marketing, you will earn)

पीसीसी केंद्रात फक्त नमुने घेतले जातात

अपोलो डायग्नोस्टिक्समध्ये पॅथॉलॉजी सेवा उपलब्ध आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. या केंद्रास वैद्यकीय संज्ञेमध्ये पीसीसी म्हणजे पेशंट केअर सेंटर म्हणतात. जेव्हा एखादा रुग्ण चाचणीसाठी येथे येतो, तेव्हा नमुना गोळा करावा लागतो. पीसीसी केंद्रात नमुना चाचणी घेतली जात नाही. नमुना गोळा केल्यानंतर निदान केंद्र (डायग्नोस्टिक सेंटर) ते मध्यवर्ती प्रयोगशाळेत पाठवते. तेथे त्याचा अहवाल तयार केला जातो आणि अहवाल ऑनलाईन अपलोड केला जातो. पीसीसी सेंटरमध्ये त्याचा अ‍ॅक्सेस आहे. ज्याच्या मदतीने सेंटरमध्ये रुग्णाला हार्ड कॉपी दिली जाते. तसेच ऑनलाईन ईमेल किंवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून हा अहवाल रुग्णाला शेअर केला जातो.

3 ते 5 लाखांची सुरुवातीची गुंतवणूक

अपोलोसारख्या मोठ्या ब्रँडचा फायदा फ्रॅन्चायझीला मिळतो. कंपनीतर्फे त्याचे प्रमोशनही केले जाते. हे पीसीसी केंद्र उघडण्यासाठी साधारण 180 ते 250 चौरस फूट क्षेत्राची आवश्यकता असते. सिंगल युनिटच्या गुंतवणूकीसाठी 3 ते 5 लाख रुपयांची गरज असते. त्याचबरोबर क्लस्टर युनिटसाठी 15 ते 20 लाखांपर्यंतची रक्कम गुंतवणूक करावी लागेल. जर जागा आपली असेल तर भाडे आकारले जाणार नाही. मात्र भाड्याने किंवा लीजवर जागा असल्यास त्याचे भाडेही दरमहा द्यावे लागेल.

5 वर्षांसाठी करार

अपोलो डायग्नोस्टिक्सला कंपनीकडून लॉजिस्टिक्स, सॉफ्टवेअर परवाना, मार्केटिंगसाठी पुरेशी मदत तसेच व्यवसाय विकास विक्री संघाची सेवा विनामूल्य मिळते. कंपनी 1 लाख रुपयांची ब्रँड फी आकारते. हा करार 5 वर्षांसाठी आहे. त्यानंतर कराराचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, आपल्याला प्रत्येक चाचणीवर कमिशन मिळते. कमिशनचा दर वेगवेगळ्या चाचणीसाठी भिन्न असतो.

फ्रेंचायझीसाठी अर्ज कसा करावा

आपणदेखील हा व्यवसाय सुरू करू इच्छित असल्यास कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला (https://www.apollodiagnostics.in/for-business-partners/franchise-pcc-single-cluster) भेट द्या. उजव्या बाजूला एक फॉर्म देण्यात आला आहे, तो फॉर्म भरा आणि सबमिट करा. आपली संपूर्ण माहिती कंपनीकडे पोहोचेल आणि आपल्याला कंपनीकडून परत कॉल केला जाईल. कंपनीच्या कस्टमर केअर सेंटरचा ईमेल आयडी customer.care@apollodiagnostics.in हा आहे. (Start a business with the Apollo brand in the medical field; The company will do the marketing, you will earn)

इतर बातम्या

ICSE, ISC Result 2021: आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर, निकाल कुठे पाहायचा?

आजवर कोणीही का चढू शकले नाही कैलास पर्वत? जाणून घ्या काय आहेत कारणे

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.