AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stock Market : शेअर बाजारात आनंदी आनंद गडे, जबरदस्त ओपनिंगमुळे उत्साह

Stock Market : भारतीय शेअर बाजाराने मरगळ झटकली आहे. बाजार आगेकूच करत आहे. गुरुवारी सकाळच्या सत्रात सेन्सक्स आणि निफ्टीने जोरदार उसळी घेतली. तर गेल्या 44 वर्षांत पहिल्यांदाच या वित्तीय संस्थेचा शेअर मात्र ट्रेडिंगमधून बाहेर आहे..

Stock Market : शेअर बाजारात आनंदी आनंद गडे, जबरदस्त ओपनिंगमुळे उत्साह
| Updated on: Jul 13, 2023 | 10:01 AM
Share

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजाराला (Share Market) अच्छे दिन आले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शेअर बाजाराची आजची चाल सर्वांनाच उभारी देणारी आहे. जागतिक घडामोडी विरोधात आहेत. पण शेअर बाजाराच्या घौडदौडीवर फार परिणाम झालेला नाही. बाजार मजबुतीकडे वाटचाल करत असल्याचे हे द्योतक आहे. चीनमध्ये विक्री सत्र आरंभत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) भारतीय बाजाराची वाट धरली आहे. स्थानिक गुंतवणूकदारांनी पण चांगली खरेदी केली आहे. गुरुवारी सकाळच्या सत्रात सेन्सक्स आणि निफ्टीने जोरदार उसळी घेतली. निफ्टीने (Nifty) 19500 अंकाजवळ सुरुवात केली. तर सेन्सेक्सने (Sensex) 65,667 अंकावर बॅटिंग केली. तर गेल्या 44 वर्षांत पहिल्यांदाच या वित्तीय संस्थेचा शेअर मात्र ट्रेडिंगमधून बाहेर आहे..

अशी झाली सुरुवात शेअर बाजाराची आजची सुरुवात दमदार होती. बीएसई या 30 शेअरच्या निर्देशांकाने 73.17 अंकासह आगेकूच केली. बीएसई निर्देशांक 65,667 अंकावर उघडला. तर एनएसई निफ्टीने 110.90 अंकांची चढाई केली. बीएसई 0.42 टक्के तर निफ्टी 0.57 अंकाच्या तेजीसह बहरला. निफ्टीने आज सकाळच्या सत्रात 19,495.20 अंकावर सुरुवात केली.

शेअर्सची स्थिती काय सेन्सेक्सच्या 30 पैकी 25 शेअर्सने घौडदौड केली. तर केवळ 5 शेअर पिछाडीवर होते. त्यांच्यामध्ये मोठी घसरण दिसून आली नाही. तर निफ्टी 50 मधील 42 शेअर्संनी मोठी उसळी घेतली. उसळी घेत या शेअर्सनी मोटा पल्ला गाठला. तर 8 शेअर्स नरमले.

या सेक्टरची दौडदौड कंझ्युमर ड्युरेबल्स सोडून इतर सर्वच सेक्टरमध्ये तेजीचे सत्र दिसून आले. मेटल शेअर्संनी मोठी उसळी घेतली. मेटल शेअर्समध्ये 0.89 टक्क्यांची वाढ दिसून आली. तर ऑटो शेअर्समध्ये 0.71 टक्क्यांची वाढ दिसून आली. फायनेन्शिअल सर्व्हिसेजमध्ये 0.63 टक्क्यांची उसळी दिसली. आयटी, मीडिया, फार्मा, हेल्थकेअर, पीएसयु बँक, बँक निफ्टी आणि ऑईल अँड गॅस शेअर्समध्ये मजबुती दिसून आली.

प्री-ओपनिंग बेल आज स्टॉक मार्केटमध्ये प्री-ओपनिंगमध्ये तेजीचे सत्र दिसले. बाजार पूर्व सत्रात बीएसई आणि निफ्टीची घौडदौड दिसून आली. बीएसई 89.96 अंकांच्या तेजीसह 65483.86 अंकावर कारभार करत होते. तर एनएसई निफ्टी 116.90 अंकांनी म्हणजे 19501.20 अंकासह तेजीत होते.

HDFC चा शेअर बाहेर गेल्या 4 दशकांपासून सुरु असलेला एचडीएफसी या हाऊसिंग फायनान्स कंपनीचा प्रवास थांबला. हा शेअर ट्रेडिंगच्या बाहेर गेला. गेल्या 44 वर्षांपर्यंत हा शेअर ट्रेडिंगमध्ये होता. एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक यांच्या विलिनीकरणानंतर हा शेअर बाजारात डी-लिस्ट करण्यात आला होता. 12 जुलै रोजीच त्याची ट्रेडिंग बंद झाली होती. 17 ऑक्टोबर 1977 रोजी एच. टी. पारेख यांनी एचडीएफसी लिमिटेडचा आयपीओ बाजारात आणला होता. त्यावेळी त्याची फेस व्हॅल्यू 100 रुपये ठेवण्यात आली होती.

कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.