Share Market ने रचला इतिहास! पहिल्यांदा 74,000 अंकाचा ओलांडला टप्पा

Share Market Sensex | बुधवारी शेअर बाजाराने शेवटच्या टप्प्यात कहर केला. यापूर्वीचे नुकसान भरुन काढले . सेन्सेक्सने पुन्हा एक नवीन इतिहास रचला. सेन्सेक्सने पहिल्यांदाच 74,000 अंकांचा टप्पा पार केला. या स्पर्धेत निफ्टीने पण मागे वळून पाहिले नाही. निफ्टीने पण नवीन रेकॉर्ड केला.

Share Market ने रचला इतिहास! पहिल्यांदा 74,000 अंकाचा ओलांडला टप्पा
Follow us
| Updated on: Mar 06, 2024 | 3:51 PM

नवी दिल्ली | 6 March 2024 : आठवड्याच्या तिसऱ्या व्यापारी सत्रात बुधवारी, शेअर बाजाराने पुन्हा करिष्मा दाखवला. शेअर बाजाराने नुकसानीची भरपाई केली. अखेरच्या एका तासात बाजार सूसाट धावला. सेन्सेक्सने पहिल्यांदाच 74,000 अंकांचा टप्पा पार केला. सेन्सेक्सने 74,106.60 अंकांची उच्चांकी उसळी घेतली. तर सेन्सेक्सने आज 73,321.48 अंकांपर्यंत निच्चांकी कामगिरी केली. आज व्यापारी सत्रात सेन्सेक्समध्ये 700 अंकांपेक्षा अधिकची तेजी दिसून आली. निफ्टी पण या स्पर्धेत उतरला. निफ्टीने 22,473.45 अंकांची उच्चांकी झेप घेतली.

बाजाराची सुरुवात सुस्त

सुरुवातीला जागतिक संकेतामुळे बाजार सुस्तावला. सलग दुसऱ्या दिवशी बाजार उघडताच कमाल दाखवू शकला नाही. बीएसई सेन्सेक्स 89 अंकांच्या घसरणीसह 73,587 अंकांच्या स्तरावर उघडला. तर एनएसई बेंचमार्क इंडेक्स निफ्टी 50 ने 28 अंकांच्या नुकसानीसह 22,327 अंकांनी सुरुवात केली. मंगळवारी दलाल स्ट्रीट लाल निशाणीसह बंद झाला होता.

हे सुद्धा वाचा

व्याजदरातील अपडेटचा परिणाम

तर अमेरिकेतील सूचकांकमध्ये 1 टक्क्यांहून अधिकची घसरण दिसली होती. आठवड्याची आर्थिक आकडेवारी फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांच्या व्याजदर कपातीच्या संकेतामुळे शेअर बाजारात विक्री सत्र सुरु झाले. मेगाकॅप ग्रोथ शेअर आणि चिप कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी विक्री झाली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेजमध्ये 1.04 टक्क्यांची घसरण दिसली. एसअँडपीमध्ये 1.02 टक्के, नॅस्डॅक कंपोझिटमध्ये 1.65 टक्के घसरण दिसली.

आशियातील बाजार

जपानमधील निक्केईमध्ये 0.2 टक्क्यांची घसरण दिसली. तर टॉपिक्समध्ये 0.3 टक्क्यांची वाढ झाली. दक्षिण कोरियातील कोस्पीमध्ये 0.25 टक्क्यांची घसरण, कोस्डेकमध्ये 0.49 टक्क्यांची वाढ दिसून आली. चीनच्या बाजारपेठेत अधिक चढउताराचे सत्र असल्याचे समजते.

बिटकॉईन सर्वकालीन उच्चाकांवर

मंगळवारी जागतिक बाजारात बिटकॉईनचा भाव 28 महिन्यांच्या विक्रमी स्तरावर पोहचला होता. नोव्हेंबर 2021 मध्ये बिटकॉईनच्या नावावर 68,991 डॉलरचा विक्रम आहे. हा रेकॉर्ड इतिहासजमा झाला. व्यापारी सत्रात बिटकॉईन 69,208.79 डॉलरच्या पण पुढे गेले. विशेष म्हणजे या 28 महिन्यात बिटकॉईन 20 हजार डॉलरहून निच्चांकावर पोहचले होते. व्याजदर वाढल्याने हा फरक दिसून आला. बिटकॉईनसह इतर क्रिप्टोकरन्सीत पण घसरण दिसून आली.गेल्या एका वर्षांत बिटकॉईनने गुंतवणूकदारांना 200 टक्के रिटर्न दिला. तर फेब्रुवारीत 20 टक्के फायदा झाला.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.