शेअरची विक्री करताच खात्यातील येईल लगेच पैसा; T+0 Settlement चा होणार मोठा फायदा

T+0 Settlement Share Market : भारतीय शेअर बाजारात गेल्या दोन वर्षांपासून अमुलाग्र बदल सुरु आहेत. बाजार नियंत्रक सेबीने तंत्रज्ञानाचा आधार घेत अनेक सुविधा पुरवल्या आहेत. सध्या T+1 Settlement ही व्यवस्था लागू आहे. आजपासून T+0 सेटलमेंट सेवेचा श्रीगणेशा होत आहे. चीननंतर अशी व्यवस्था आणणारा भारत हा दुसरा देश ठरला आहे.

शेअरची विक्री करताच खात्यातील येईल लगेच पैसा; T+0 Settlement चा होणार मोठा फायदा
आता खात्यात झटपट येईल पैसा
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 9:22 AM

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी ही माहिती महत्वाची ठरणार आहे. आजापासून स्टॉक मार्केटमध्ये शेअरची खरेदी-विक्रीसाठी नवीन पद्धत लागू होत आहे. शेअर बाजारात T+0 सेटलमेंट व्यवस्था आजपासून लागू होत आहे. म्हणजे एकडे शेअर बाजारात सौदा पूर्ण झाला की, लागलीच पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. शेअर विक्री केल्यावर पैशांसाठी आता एका दिवसाची पण वाट पाहण्याची गरज नाही. मुंबई स्टॉक एक्सचेंजने (BSE) ज्यांच्यासाठी 28 मार्च 2024 पासून हा नियम लागू होणार आहे, अशा कंपन्यांची यादी पण जाहीर केली आहे. T+0 ही व्यवस्था लागू झाल्यामुळे भारत हा चीननंतर अशी व्यवस्था देणारा जगातील दुसरा देश ठरला आहे.

जगात चीननंतर भारत

सध्या भारतीय शेअर बाजारात T+1 व्यवस्था लागू आहे. म्हणजे ट्रेंडिगनंतर एका दिवसात शेअर विक्रीची रक्कम खात्यात जमा होते. जगातील अनेक देशात सध्या T+2 अशी व्यवस्था आहे. T+0 ही व्यवस्था आजपासून लागू होत आहे. अशी व्यवस्था लागू करणारा भारत हा चीननंतरचा जगातील दुसरा देश ठरला आहे. आज 28 मार्चपासून कॅश सेगमेंटमध्ये गुंतवणूकदारांच्या खात्यात झटपट पैसा जमा होईल. सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी-बूच यांनी यापूर्वीच ही माहिती दिली होती. आता शेअरच्या खरेदी-विक्रीचा झटपट व्यवहार होईल.

हे सुद्धा वाचा

नियम दोन टप्प्यात लागू

  1. मार्केट नियंत्रक सेबीने या नियमांची महिती दिली आहे. त्यानुसार, शेअर बाजारात दोन टप्प्यात हा नियम लागू करण्यात येत आहे. T+0 दुपारी 1:30 वाजेपर्यंत व्यापारासाठी मदत करेल. यामध्ये शेअरचा पैसा संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल. T+0 लागू झाल्याने सेटलमेंट करताना लिक्विडीटीची अडचण येणार नाही. गुंतवणूकदाराकडे T+1 ऐवजी T+0 आणि झटपट सेटलमेंटचा पर्याय असेल.
  2. दुसऱ्या टप्प्यात गुंतवणूकदारांना 3:30 वाजेपर्यंतच्या सर्व व्यवहारासाठी पर्यायी झटपट सेटलमेंटचा पर्याय मिळेल. ट्रेडर्स, गुंतवणूकदार अशा पर्यायाद्वारे सहज ट्रेडिंग करतील. त्यामुळे खात्यात रक्कम जमा होण्यासाठी त्यांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.
  3. सेबीचे म्युच्युअल फंडावर बारकाईने नजर ठेवत आहे. त्यासाठी जवळपास 80 एल्गोरिदमचा वापर करण्यात येत आहे. फंड हाऊसने गडबडी केल्यास त्यासंबंधीचा अहवाल लागलीच तयार करण्यात येत आहे. आता AI ची मदत घेण्यात येत आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने व्यवहार होत असेल तर ते समोर येणार आहे.
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.