AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रम्प यांनी टॅरिफ लावताच TATA कंपनीने टाकले असे फासे, युरोपमध्ये स्थिती मजबूत

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. त्यामुळे भारताच्या निर्यातीवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑटो क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. मात्र भारतीय कंपनी टाटाने या टॅरिफच्या चक्रव्यूहात एक मोठा डाव खेळला आहे.

ट्रम्प यांनी टॅरिफ लावताच TATA कंपनीने टाकले असे फासे, युरोपमध्ये स्थिती मजबूत
ट्रम्प यांनी टॅरिफ लावताच TATA कंपनीने टाकले असे फासे, युरोपमध्ये स्थिती मजबूतImage Credit source: TV9 Network/File
| Updated on: Aug 07, 2025 | 6:38 PM
Share

टाटा ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी आहे. या कंपनीत अनेक उत्पादनं तयार होतात. त्याची निर्यात केली जाते. पण अमरेकिने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याने पुढची गणितं बिघडणार आहेत. असं असताना टाटाने युरोपची ऑटो कॉम्पोनेंट कंपनी विकत घेतल आहे. देशात मोठ्या प्रमाणात ऑटो पार्ट बनवणाऱ्या टाटा ऑटोकॉम्प सिस्टमने गुरुवारी स्पष्ट केलं की, स्लोवाकियाची आयएसी ग्रुप कंपनी विकत घेण्यासाठी एक करार केला आहे. पण हा करार किती रुपयांचा झाला आहे याबाबत मात्र काहीच सांगितलं नाही. टाटा कंपनीने आपल्या ब्रिटीश सब्सिडियरी आर्टिफेक्स इंटेरियर सिस्टम लिमिटेडच्या माध्यमातून आयएसी ग्रुपचे 100 टक्के शेअर विकत घेण्यासाठी करार केला आहे. टाटा कंपनीने स्पष्ट केलं की, या करारामुळे कंपनीची क्षमता वाढेल आणि युके आणि युरोपियन बाजारात विस्तार करण्यात मदत करेल. अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादल्यानंतर टाटाने हा करार केला आहे.

युरोपमध्ये टाटा कंपनीची स्थिती होणार भक्कम

आयएसी ग्रुपसोबत झालेल्या करारानंतर टाटा कंपनीसाठी युरोपमध्ये एक मोठं व्यासपीठ मिळालं आहे. यामुळे टाटा युरोपमध्ये ऑटो क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणू शकते. जागतिक पातळीवर भारतीय कंपनीची भरारी हेच स्वप्न दाखवत आहे. दरम्यान, कंपनीने स्पष्ट केलं की, हा करार पूर्ण होण्यासाठी काही अवधी लागू शकतो. यात काही कायदेशीर बाबींची पूर्तता होणं आवश्यक आहे. टाटा ऑटोकॅम्पचे व्हाईस चेअरमन अरविंद गोयल यांनी सांगितलं की, आयएसी स्लोवाकियासोबतचा करार टाटा ऑटोकाँम्पच्या जागतिक स्तरावरील प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. आर्टिफेक्सच्या आमच्या मागील अधिग्रहणानंतर, हे पाऊल युरोपमधील आमची उपस्थिती मजबूत करते आणि जागतिक OEM ला अधिक प्रभावीपणे सेवा देण्याची आमची वचनबद्धता दर्शवते.

भारत हा जगातील सर्वात मोठ्या ऑटो निर्यातदारांपैकी एक आहे. त्यामुळे अमेरिकेने टॅरिफ लादला असला तरी इतर देशात कंपनीची पकड आणखी मजबूत झाली आहे. या करारामुळे टाटा युरोप आणि युकेसारख्या देशात कंपोनंट निर्यात मजबूत करण्यास मदत करेल. अमेरिकेने लादलेला 50 टक्के कर म्हणजे 100 रुपयांची भारतीय वस्तू अमेरिकेत 150 रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे अमेरिकेला कररूपी पैसे मिळतील. तसेच भारतीय माल अमेरिकेत खपला जाणार नाही. त्यामुळे त्यांच्याच देशातील उत्पादनांना फायदा मिळेल.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.