AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today : राज्यातील या शहरात पेट्रोल-डिझेल सर्वाधिक महाग! आज कुठेच नाही दिलासा

Petrol Diesel Price Today : आज वाहनाची टाकी फुल्ल करण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर जरुर लक्ष ठेवा. राज्यात कोणत्याच शहरात आज इंधन स्वस्ताई नाही. काही ठिकाणी इंधनाने जास्त जोर दाखवला तर काही शहरात भाव कमजोर आहेत.

Petrol Diesel Price Today : राज्यातील या शहरात पेट्रोल-डिझेल सर्वाधिक महाग! आज कुठेच नाही दिलासा
आज कुठे महाग, कुठे स्वस्त
| Updated on: May 09, 2023 | 8:41 AM
Share

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलात नरमाई आहे. भाव झरझर घसरले. गेल्या एक महिन्यांपासून कच्चा तेलााने 88 डॉलर प्रति बॅरलपर्यंत उसळी घेतली होती. ओपेक प्लस देशांनी कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्याची घोषणा केल्याने किंमती भडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली. पण आता मेचा दुसरा आठवडा संपत येत असताना किंमती मात्र आटोक्यात आहेत. ओपेक देशांच्या निर्णयाचा परिणाम कधी दिसणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. देशात सकाळी 6 वाजता पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Price) जाहीर केला. राज्यातील सर्वच शहरात आज भाव वधारलेला आहे. कोणत्याच शहरातील नागरिकांना दिलासा नाही. तुमच्या शहरात इंधन महागले की स्वस्त झाले, जाणून घ्या.

कच्चा तेलात घसरण आज 9 मे रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 0.27 टक्क्यांनी घसरुन हा भाव 72.96 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 0.31 टक्क्यांनी कमी झाले. भाव 76.77 डॉलर प्रति बॅरल झाले.

एक लिटरवर कराचे गणित एक लिटर पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकारला करातून किती फायदा होतो ते समजू घेऊयात. 1 मे रोजी एखाद्या शहरातील पेट्रोलचा भाव 96.72 रुपये असेल तर त्यात 35.61 रुपये कराचे समाविष्ट असतात. या रक्कमेत 19.90 रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत तर राज्य सरकारच्या तिजोरीत 15.71 रुपये जमा होतात. एक लिटर पेट्रोलवर डिलरला 3.76 रुपये कमिशन मिळते. वाहतूकीसाठी 0.20 पैसा द्यावे लागतील.

अशी झाली कमाई

  1. केंद्र सरकार गेल्या पाच वर्षांतील कमाईचे आकडे सादर केले
  2. केंद्र आणि राज्य सरकार दोघांना इंधनाच्या करातून जोरदार फायदा झाला
  3. 2022-23 च्या 9 महिन्यांत 5,45,002 कोटी रुपयांची कमाई पेट्रोलियम उत्पादनातून झाली
  4. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 7,74,425 कोटी, 2019-20 मध्ये 5,55,370 कोटी रुपये
  5. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 5,75,632 कोटी, 2017-18 मध्ये 5,43,026 कोटी रुपये फायदा झाला

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.36 तर डिझेल 92.88 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.45 रुपये आणि डिझेल 92.99 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.44 तर डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 106.75 पेट्रोल आणि डिझेल 93.24 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.25 आणि डिझेल 92.77 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 107.40 आणि डिझेल 93.90 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.83 तर डिझेल 94.30 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.34 तर डिझेल 92.88 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.37 तर डिझेल 94.83 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.86 रुपये आणि डिझेल 93.36 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 109.33 तर डिझेल 95.73 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.21 आणि डिझेल 92.72 रुपये प्रति लिटर
  14. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.32 रुपये तर डिझेल 92.85 रुपये प्रति लिटर
  15. ठाणे पेट्रोलचा दर 106.45 रुपये तर डिझेल 94.41 रुपये प्रति लिटर

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.