AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NPS ने गुंतवणूकदार श्रीमंत, जितकी लवकर गुंतवणूक तितकाच मोठा फायदा

सोमवारी येथे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) इन्शुरन्स अँड पेन्शन समिट 'इंडियन इन्शुरन्स सेक्टर - रायडिंग द वेव्ह ऑफ चेंज' या परिषदेला संबोधित करताना बंडोपाध्याय म्हणाले, "गेल्या 12 वर्षांमध्ये इक्विटी योजनांतर्गत 12 टक्के परतावा दिलाय. सरकारी रोख्यांमध्ये ते 9.9 टक्के आहे. कॉर्पोरेट बाँड्समध्ये काही कर्ज-संबंधित घडामोडी असूनही ते वर्षभरात 9.59 टक्के राहिले.

NPS ने गुंतवणूकदार श्रीमंत, जितकी लवकर गुंतवणूक तितकाच मोठा फायदा
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 06, 2021 | 11:41 PM
Share

नवी दिल्लीः राष्ट्रीय पेन्शन सिस्टम (NPS) ने गेल्या 12 वर्षांत लोकांना चांगला परतावा दिलाय, अशी माहिती पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) चे अध्यक्ष सुप्रतीम बंदोपाध्याय यांनी दिली. ते म्हणाले की, जास्तीत जास्त लाभ मिळविण्यासाठी कोणत्याही व्यक्तीने किंवा भागधारकाने या उत्पादनात लवकर गुंतवणूक करण्यास सुरुवात केली पाहिजे. तसे पाहिले तर सध्या बँकांमध्ये एफडीवर 6 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात आहे, तर एनपीएसमधून लोकांना दीड ते दोन पट परतावा मिळालाय. PPF वर तुम्हाला फक्त 7.1 टक्के परतावा मिळेल.

गेल्या 12 वर्षांमध्ये इक्विटी योजनांतर्गत 12 टक्के परतावा दिलाय

सोमवारी येथे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) इन्शुरन्स अँड पेन्शन समिट ‘इंडियन इन्शुरन्स सेक्टर – रायडिंग द वेव्ह ऑफ चेंज’ या परिषदेला संबोधित करताना बंडोपाध्याय म्हणाले, “गेल्या 12 वर्षांमध्ये इक्विटी योजनांतर्गत 12 टक्के परतावा दिलाय. सरकारी रोख्यांमध्ये ते 9.9 टक्के आहे. कॉर्पोरेट बाँड्समध्ये काही कर्ज-संबंधित घडामोडी असूनही ते वर्षभरात 9.59 टक्के राहिले. आमची पेन्शन फंड मालमत्ता या घडामोडींमध्ये मोठ्या प्रमाणात टिकून आहे.

एकूण 6,850 अब्ज रुपये

बंडोपाध्याय म्हणाले की, सध्या आमच्याकडे एकूण 6,850 अब्ज रुपयांचा निधी आहे. परतावा खूप चांगला मिळाला आहे. NPS एक अतिशय लवचिक दृष्टीकोन स्वीकारण्याचा पर्याय देते. मात्र यामध्ये गुंतवणूक लवकर करायला हवी. तुम्हाला फक्त एक हजार रुपये द्यावे लागतील, यामध्ये कोणतेही निश्चित योगदान नाही. मनी लाँडरिंग विरोधी कायदा (PMLA) चे पालन करून सर्व ज्ञात स्त्रोतांकडून मिळालेल्या तुमच्या उत्पन्नाच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्याही स्तरावर त्यात योगदान देऊ शकता.

पेन्शनबाबत जनजागृती करण्याची गरज

भारताला पेन्शनधारक समाज बनवण्यासाठी अजून खूप काही करण्याची गरज आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) PFRDA आणि CII यांनी मिळून देशात पेन्शनबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी एक व्यासपीठ तयार केले पाहिजे, असंही बंडोपाध्याय यांनी सांगितले. PFRDA NPS आणि अटल पेन्शन योजना (APY) या दोन पेन्शन योजना ऑफर करते.

2004 मध्ये NPS लाँच करण्यात आले

NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टीम ही सेवानिवृत्तीसाठी सर्वोत्तम योजना मानली जाते. सरकारने 2004 मध्ये पहिल्या सरकारी कर्मचाऱ्यासाठी NPS सुरू केले. 2009 मध्ये सर्वसामान्यांनाही यात गुंतवणुकीचे स्वातंत्र्य देण्यात आले. NPS ची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्यात निवृत्तीपर्यंत गुंतवणूक करता. तसा तो बराच शिस्तबद्ध राहतो. हा असा फंड आहे ज्यामध्ये तुम्ही थोडी गुंतवणूक करता पण रिटायरमेंट फंड खूप जास्त होतात. तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितका जास्त फायदा होईल.

संबंधित बातम्या

RBI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील आता ‘या’ बँकेवर बंदी, ग्राहकांना फक्त 10 हजार काढता येणार

उज्ज्वला योजनेंतर्गत आतापर्यंत 8.8 कोटी LPG गॅस कनेक्शन जारी

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...