Today petrol, diesel rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर (petrol, diesel rates) जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात देशासह राज्याच्या प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर

Today petrol, diesel rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 11:00 AM

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे (Fuel) नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल (petrol), डिझेलचे (diesel) दर स्थिर आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सलग 49 दिवसांपासून देशात इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. केंद्र सरकारने 21 मे रोजी एक्साईज ड्यूटीमध्ये कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 22 मेला पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपये प्रति लिटर स्वस्त झाले होते. मात्र त्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एकीकडे कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहे. मात्र दुसरीकडे पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आल्याने त्याचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसत आहे. मार्जीनमध्ये देखील घट झाली आहे. परिणामी पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा कमी कण्यात आला आहे.

देशाच्या प्रमुख शहरांमधील पेट्रोल, डिझेलचे भाव

आज जारी करण्यात आलेल्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये एवढा आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये एवढा आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये एवढा आहे. चन्नेईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये एवढा असून, डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये असून, डिझेलचा भाव प्रति लिटर 92.76 रुपये इतका आहे. मेट्रो सिटीमधील पेट्रोल, डिझेलच्या भावाची तुलना करायची झाल्यास सर्वात स्वस्त पेट्रोल हे दिल्लीमध्ये तर सर्वात महाग पेट्रोल हे मुंबईमध्ये मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यातील पेट्रोल, डिझेलचे भाव

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई111.3097.28
पुणे111. 3098
नाशिक111.2595.73
नागपूर111.4195.73
कोल्हापूर111.0295.54

महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार?

राज्यात नवे सरकार सत्तेत येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे भविष्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्यास राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. सध्या देशात सर्वात स्वस्त पेट्रोल दिल्लीमध्ये मिळत आहे.

Non Stop LIVE Update
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.
मिस्टर राज नॉट माय टार्गेट, तर माझ टार्गेट.. अंधारेंचा कुणावर हल्लाबोल
मिस्टर राज नॉट माय टार्गेट, तर माझ टार्गेट.. अंधारेंचा कुणावर हल्लाबोल.
दादांना शून्य जागा, सुनेत्रा पवार हरणार? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा काय
दादांना शून्य जागा, सुनेत्रा पवार हरणार? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा काय.