AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPI Universal : युपीआय झालं युनिव्हर्सल, या देशांमध्ये युपीआयद्वारे करा रुपयात व्यवहार

UPI Universal : UPI च्या माध्यमातून तुम्हाला जगभर लवकरच भारतीय रुपयात व्यवहार करता येईल. या काही देशात तुम्ही करन्सी एक्सचेंज नाही केली तरी अडचण येणार नाही. तिथल्या पेमेंट सिस्टिमशी जोडणी झाली असल्याने तुम्हाला तिथे पण युपीआयचा वापर करुन रक्कम अदा करता येईल.

UPI Universal : युपीआय झालं युनिव्हर्सल, या देशांमध्ये युपीआयद्वारे करा रुपयात व्यवहार
| Updated on: Jul 14, 2023 | 4:55 PM
Share

नवी दिल्ली : आता भारतीय पर्यटकांना आयफल टॉवर पाहण्यासाठी लवकरच युपीआयचा (UPI Payment) वापर करता येईल. त्यासाठी त्यांना करन्सी एक्सचेंजची पण गरज भासणार नाही. जगातील अनेक देशात युपीआयचा डंका वाजला आहे. अनेक प्रगत अर्थव्यवस्थांनी भारतीय डिजिटल पेमेंट सिस्टिमला मंजुरी दिली आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलमधील युपीआयच्या माध्यमातून कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला रक्कम अदा करता येईल. त्यामुळे लाखो भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय युपीआय ही पेमेंट सिस्टिम जगभरात झपाट्याने लोकप्रिय होत आहे. भारताच्या या आधुनिक पेमेंट तंत्रज्ञानामुळे फॉरेक्स कार्डची (Forex Card) लवकरच सुट्टी होण्याची शक्यता आहे.

फ्रान्सने केला स्वीकार शुक्रवारी, 14 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयीची घोषणा केली. पंतप्रधान सध्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. भारतातील सर्वात यशस्वी पेमेंट सिस्टिम युपीआयचा उपयोग फ्रान्समध्ये करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आता आयफल टॉवर पाहण्यासाठी भारतीय युपीआयचा वापर करु शकतील. रुपयामध्ये ते पेमेंट करु शकतील, अशी घोषणा पंतप्रधानांनी नुकतीच केली.

इतक्या देशांमध्ये सुरुवात यावर्षी जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने किती देशांमध्ये युपीआयचा वापर सुरु झाला, त्याची माहिती दिली. जवळपास 10 देशातील अनिवासी भारतीयांना पैसे पाठवणे आणि ते स्वीकारण्यासाठी युपीआयचा उपयोग करता येणार आहे. स्थानिक बँक खाते परदेशातील मोबाईल क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे. तरच युपीआयचा वापर करता येईल.

कोणते आहेत देश युपीआयद्वारे पेमेंट करता येऊ शकणाऱ्या देशांची यादी देण्यात आली आहे. त्यानुसार, भुतान, सिंगापुर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाँगकाँग, ओमान, कतार, अमेरिका, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, यूनाइटेड किंगडम आणि लवकरच फ्रान्सचा या यादीत समावेश होईल. सर्वात अगोदर भुतानने भारताची युपीआय पेमेंट पद्धत स्वीकारली होती. जुलै 2021 मध्ये भुतानने BHIM App माध्यमातून UPI पेमेंट व्यवहाराला मंजुरी दिली होती.

कोणाला फायदा या सुविधाचा फायदा प्रवासी भारतीय, विद्यार्थी, व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबियांना प्राधान्याने घेता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानुसार, 2022 मध्ये देसात युपीआयच्या माध्यमातून 12,6000 अब्ज रुपयांहून अधिक 74 अब्ज व्यवहार झाले आहेत. या वाढत्या व्यवहारांमुळे देशात विकसीत या पेमेंट पद्धतीवर विश्वास असल्याचे दिसून येत असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

खास निधीची तरतूद केंद्र सरकारने रुपे डेबिट कार्ड आणि भीम-युपीआय व्यवहारांना अधिक गती देण्यासाठी प्रोत्साहन लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एका सामान्य वापारकर्त्यासह व्यापाऱ्यापर्यंत सर्वांना मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने त्यासाठी एकूण 2,600 कोटी रुपयांची खास तरतूद केली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.